Akshardhara Book Gallery
Sakha Kalal (सखा कलाल)
Sakha Kalal (सखा कलाल)
Couldn't load pickup availability
Author: Rafik Suraj
Share
Publisher: Sahitya Akademi
Pages: 71
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
भारतीय साहित्याचे निर्माते
सखा कलाल
लेखक : रफीक सूरजसखा कलाल (1938-2019) यांचे मराठी कथेतील स्थान महत्त्वपूर्ण असे आहे. मोजकेच लेखन करून त्यांनी मराठी कथेला व्यापक परिमाणे मिळवून दिली. आपल्या सभोवतालच्या जगाविषयी, माणूस आणि त्याच्या जीवन- व्यवहाराविषयी कलालांना प्रचंड कुतुहल आहे. त्यांनी आपल्या कथेत ग्रामीण वास्तवाचे, त्यातील विविध सामाजिक स्तरांतील जीवनाचे, जातिजमातींचे चित्रण केले. कोणतेही पूर्वग्रह न बाळगता मोकळेपणाने जीवनानुभवाला सामोरे जाणे, त्याचा स्वीकार करणे ही त्यांची मूलतः वृत्ती आहे. कथेचा आटोपशीर घाट निवडून त्यांनी व्यापक अशा मानवी जीवनसंदर्भांना त्यांच्या खास अशा शैलीत दृगोचर केले. रंजन हा त्यांच्या कथेचा उद्देश नाही. त्यांच्या कथेत असणारी साधी घटनाही मनोविश्लेषणाच्या पातळीवर गहिरे रूप धारण करते आणि कथेला अधिक महत्त्वाचा अवकाश प्राप्त करून देते. कलालांची कथा सातत्याने श्रेष्ठ दर्जाच्या कलात्मक अनुभूतीचा प्रत्यय देते. त्यामुळे त्यांचे लेखन लक्षणीय ठरते.
लेखक : रफीक सूरज
