Akshardhara Book Gallery
Samajkrantiche Janak Krantiguru : Lahuji Salve (समाजक्रांतीचे जनक क्रांतिगुरू : लहुजी साळवे)
Samajkrantiche Janak Krantiguru : Lahuji Salve (समाजक्रांतीचे जनक क्रांतिगुरू : लहुजी साळवे)
Couldn't load pickup availability
Author: Dr. Raj Taderao
Share
Publisher: Aksharyatra Prakashan
Pages: 204
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
समाजक्रांतीचे जनक क्रांतिगुरू : लहुजी साळवे
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्राच्या समाजवास्तवातील अन्याय, विषमता व शोषणनिगडित जाणीव आकारास येणे, त्यासोबत संघर्षातून परिवर्तनाच्या शक्यतेचे समाजभान प्रत्यक्षात अवतरतणे, या प्रक्रियांचे प्रतीक म्हणून लहुजी साळवे यांच्याकडे पाहिले जावू शकते. डॉ. राज ताडेराव यांचा सदर प्रक्रिया विशद करत, लहुजी साळवेंचा चरित्ररूपी इतिहास लिहिण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. ताडेरावांचे हे पुस्तक केवळ लहुजींच्या व्यक्तित्त्वाची जडणघडण, अनुभवांतून येणारी मुक्तिदायी विचारांची स्पष्टता तसेच महाराष्ट्रातील समाजपरिवर्तनाचे एक आद्यक्रांतिकारी म्हणून लहुजी अशा अनेक बाबींचे सविस्तर वर्णनच नाही; तर तत्कालीन मूकनायकांचे योगदान व शोषित वंचितांच्या इतिहास लेखनपद्धतीच्या दृष्टीने एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासावरही हे पुस्तक चर्चा करते. शिवविचारांचा वारसा सांगत लहुजींच्या कार्यकर्तृत्वाची समकालीन समर्पकता दर्शविते.
लेखक. डॉ. राज ताडेराव
प्रकाशक. अक्षरयात्रा प्रकाशन
