Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Samarth (समर्थ)

Samarth (समर्थ)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Manjushri Gokhale

Publisher: Mehta Publishing House

Pages: 286

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

समर्थ

राज्याभिषेकानंतर चार-पाच दिवसांनी समर्थ राजांना भेटायला रायगडावर गेले. माँ साहेब म्हणाल्या, "शिवबा, आत्तापर्यंत तुम्ही जे मिळवलंत ते सारं स्वामींच्या झोळीत टाका. त्यांचाच आशीर्वाद लाभलेला आहे या सगळ्याला!" राजे समजले. त्यांनी चौरंगावर ठेवलेल्या कलशातून आपल्या उजव्या हातावर पाणी घेतलं. कलश खाली ठेवून समर्थांचा उजवा हात आपल्या डाव्या हातात धरला आणि आपल्या उजव्या हातातलं उदक ते समर्थांच्या उजव्या हातावर सोडणार तोच -"राजे थांबा! आम्हाला उमजलंय तुम्ही काय करणार आहात ते!" समर्थ गरजले. शिवबांचा हात थबकला. तो ओला हात आपल्या मस्तकाला लावून समर्थ म्हणाले, "शिवबा थांबा! अहो, हे राज्य त्या रामरायाचे आहे आणि ते सांभाळण्यासाठी त्याने आपल्याला निवडले आहे. हे राज्य आपणच सांभाळावे. राजे, महाराष्ट्र भूचं सौभाग्य तुम्ही सालंकृत केलंत हीच आमच्यासाठी मोठी भिक्षा आहे. आम्ही ती भरून पावलो आहोत. आम्ही कृतार्थ आहोत. रामराया तुम्हाला सामर्थ्य देईल!" असा राजांना पुन्हा मन भरून आशीर्वाद देऊन समर्थ तिथून बाहेर पडले.

लेखक. मंजुश्री गोखले 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस  

View full details