Akshardhara Book Gallery
Samjutdar Janivanche Kavdse (समजूतदार जाणिवांचे कवडसे)
Samjutdar Janivanche Kavdse (समजूतदार जाणिवांचे कवडसे)
Share
Couldn't load pickup availability
Author: Balkrushna Sonawane
Publisher: Varnamudra Publishers
Pages: 144
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
समजूतदार जाणिवांचे कवडसे
बाळकृष्ण सोनवणे यांची कविता जगण्याला विन्मुख न होणारी, सश्रद्ध मनाचा लोभस अविष्कार करणारी आणि स्वतःचा थेट आतून बाहेरून शोध घेणारी आहे. विखुरलेपण, संवाद, अलिप्तता, हरवलेल्या संवेदना, मूल्यञ्हास या सर्वांमुळे स्वतःवरचाच भरवसा उडत जावा अशा वातावरणाचा वेध ही कविता समर्थपणे घेते. वर्तमान जगण्यातले अनेक प्रश्न या कवितेतून उभे राहतात. जातिवाद, पोकळ समाजवाद, विषमता यामुळे पराभूत होत परस्परांपासून दूर झालेली माणसे व त्यांचे मुल्यहीन जगणे कवीच्या काळजावर चरे पडतात. मानवी जगण्यातलं सौहार्दाचं आकाश फाटल्याचं दुःख, ताटातुटीमुळे पराभवाची गाणी गाणाऱ्या वस्त्या, दहशतवादाचं पसरत जाणारं साम्राज्य, क्रौर्य-कामुकता-गलिच्छपणा यांचा उग्र गंध सोसत वाट तुडवणाऱ्या बायाबापड्या नि निरागस मुली, कायद्याचे तोकडेपण, समोर दिसणारी विनाशाची वाट यातून मार्ग सापडत नसल्याचा उच्चार ही कविता करते. परिणामी स्तब्धता, हताशता आणि ओठ दाबून आत्ममग्न होण्याची सामान्य माणसाची अगतिकता या कवितेच्या केंद्रस्थानी येऊ पाहते. जीव गुदमरून जावा अशा टोकदार अनुभवांचे कंगोरे आणि उद्ध्वस्त होत जाणारी माणसे यातून जगण्याची दिशाहीन वास्तवता बाळकृष्ण सोनवणे अधोरेखित करतात. या कटू सत्याला स्वीकारत्त शेतीमातीशी जोडलेलं नातं, आईची माया, आजीच्या आठवणी, प्रिये साठीची श्रृंगाराची साद यांचे पाझर त्यांच्या कवितेतून पाझरत राहतात. सर्वव्यापी चैतन्याच्या आणि जीवनसत्याच्या शोधासाठी ही कविता तदाकार होऊन शब्दब्रह्माला गवसणी घालू पाहते. एकूणच भोवतालच्या अनार्त कोलाहलात करुणाकर साकारण्याची आस बाळगणारी ही कविता तीव्र संवेदनशीलता प्रभावीपणे अभिव्यक्त करीत राहते.
लेखक. बाळकृष्ण सोनावणे
प्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स
