Akshardhara Book Gallery
Samrajya Burkhyamagche (साम्राज्य बुरख्यामागचे)
Samrajya Burkhyamagche (साम्राज्य बुरख्यामागचे)
Share
Couldn't load pickup availability
Author: Carmen Bin Ladin
Publisher: Mehta Publishing House
Pages: 170
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Avinash Darp
साम्राज्य बुरख्यामागचे
११ सप्टेंबर २००१ - प्रकाशाला लागले ग्रहण !
न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या भावंडाप्रमाणे असलेल्या टॉवर्सवर दोन विमानांनी धडक दिली आणि केवळ त्या देशावरच नव्हे तर सा-या जगावर भीतीचं सावट पसरलं...
मानवतेवर प्रेम करणा-यांची मनं होरपळून निघाली.
करमेन बिन लादेननं जिनिव्हात ही भयंकर बातमी ऐकली आणि ती सुन्न झली. तिच्या डोळ्यांपुढे त्या इमारतींतून घुसमटत बाहेर पडणारे धुराचे ढग उभे राहिले. त्या ढगातून एकच आकृती नाचत होती... ती आकृती होती करमेनच्य धाकट्या दिराची...
ओसाम बिन लादेनची.
या कृत्यामागे करमेनच्य मुलींचा हात असावा असं आरोप वर्तमानपत्रातून आणि दूरदर्शनवरून होऊ लागल्यावर ती अधिक
व्यथित झाली. आपल्या लेकींना स्वतंत्र आयुष्य जगता यावं यासाठी येस्लमबरोबर रीतसर घटस्फोट घेऊन करमेन जिनिव्हत रमली होती; परंतु एखाद्या मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारल्यावर माश्या चवताळून चावे घ्यायला उठतात, तसेच काहीसे झाले. मग तिनं वर्तमानपत्रं, दूरदर्शनवर जाऊन सा-या सा-या गोष्टींचा सविस्तर खुलासा केलं. त्या काळातल्या सौदी अरेबियातील कडूगोड आठवणी तिनं या पुस्तकात वस्तुनिष्ठपणे मांडलेल्या आहेत. मुलींच्या सुखासाठी तिनं दिलेल्या झगड्याची ही कहाणी आहे.
Author. Carmen Bin Ladin
Translator. Avinash Darp
Publication. Mehta Publishing House
