Akshardhara Book Gallery
Sangli jilhyatil swatantryasainikanchya shauryakatha (सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्यकथा)
Sangli jilhyatil swatantryasainikanchya shauryakatha (सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्यकथा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Prof. Dr. Shivaji Mhaske
Publisher: Mihana Publications
Pages: 532
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्यकथा
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक धगधगतं पर्व म्हणजे 'प्रतिसरकार'. १९४२ च्या चले जाव आंदोलनादरम्यान सातारा व सांगली परिसरात क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, बाबूजी पाटणकर, जी. डी. बापू लाड, बर्डेगुरुजी, आप्पासाहेब लाड इत्यादी महत्त्वपूर्ण नेत्यांच्या नेतृत्वात ब्रिटिश शासनाविरुद्ध प्रतिसरकारची स्थापना करण्यात आली. १९४२ ते १९४६ या कालावधीत हे समांतर सरकार म्हणजेच 'प्रतिसरकार' ब्रिटिश शासनाविरुद्ध कार्य करीत होते. गावातील गावटगे, गावगुंड, ब्रिटिशधार्जीणे शेठ व सावकार यांच्या पिळवणुकीविरुद्ध प्रतिसरकारने वाखाणण्याजोगे कार्य केले होते. प्रतिसरकारच्या कार्यकाळात अनेक क्रांतिवीरांना आपले बलिदान द्यावे लागले. यामध्ये प्रामुख्याने हुतात्मा किसन अहिर, पंजाब मधून आलेले हुतात्मा नानकसिंग, शालेय विद्यार्थी हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे, हुतात्मा विष्णू बारपटे, हुतात्मा रविशंकर पंड्या व यांच्यासारख्या अनेक वीरांनी देशासाठी बलिदान दिले. प्रतिसरकारच्या या कार्यकाळामध्ये या भागातील ब्रिटिश यंत्रणा खिळखिळी झाली होती. अनेक क्रांतिवीरांनी आपले घरदार सोडून भूमिगत राहून ब्रिटिशांविरुद्ध कार्य केले होते. मात्र आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कार्य केलेल्या या स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग व त्यांनी केलेले बलिदान विसरले जात आहे. त्यांच्या आठवणी व त्यांचा गौरवशाली इतिहास स्मृतीआड केल्या जात आहे. हा इतिहास अतिशय प्रेरणादायी असून पुढील पिढ्यांपर्यंत घेऊन जाणे आवश्यक आहे. प्रस्तुत ग्रंथात हा त्यागाचा व बलिदानाचा इतिहास जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
लेखक. प्रा. डॉ. शिवाजी म्हस्के
प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन्स
