Akshardhara Book Gallery
Sanshodhan : Svarup Aani Vyapti (संशोधन : स्वरूप आणि व्याप्ती )
Sanshodhan : Svarup Aani Vyapti (संशोधन : स्वरूप आणि व्याप्ती )
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Manda Khandage, Prof. Dr. Kirti Mulik, Dr. Sujata Shenai
Publisher: Sanskruti Prakashan
Pages: 306
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
संशोधन : स्वरूप आणि व्याप्ती
संशोधन म्हणजे नांगरलेली, नांगरू पाहात असलेली आणि नांगरल्यावीण राहिलेली भूमी आहे. शोध, चिकित्सा, मांडणी आणि फलित या संशोधन चौकोनाच्या प्रातिनिधिक कोनात दडलेल्या अनेक कोनांचा सूक्ष्मपणे आणि सजगतेने वेध घेत राहाणे ही संशोधकाची वृत्ती असली पाहिजे. संशोधनाने काय साधले हे जसे महत्त्वाचे तसे संशोधनाने किती नवीन आयाम खुले केले हे ही महत्त्वाचे असते. या पुस्तकातून याच्या दिशा गवसतील असे वाटते. संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक क्षेत्रात संशोधनाने बहुमोल कामगिरी केली असली तरी अजूनही कित्येक क्षेत्रात वाव आहे, याची जाणीव या पुस्तकातून होईल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संशोधकाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणे सहज शक्य झाले आहे. ही जशी आनंदाची बाब आहे तशी जबाबदारीचीही ठरते. संशोधक, मार्गदर्शक आणि हाती आलेले संशोधन या त्रयींचा संगम समाजाला ज्ञानात्मक दृष्ट्या पुढे नेण्यासाठी कारणीभूत ठरतो. या पुस्तकाच्या निमित्ताने याची सांगड घातली जात आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संशोधन विभागाने आतापर्यंत संशोधनाधिष्ठित अनेक चांगले, अभ्यासपूर्ण प्रकल्प केले आहेत. या पुस्तकाने त्यात निश्चित भर पडेल असे वाटते. संशोधन क्षेत्रात अधिकाधिक उन्नती होवो हीच सदिच्छा!
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन
