Sanskrutik Vruksha (सांस्कृतिक वृक्ष )
Sanskrutik Vruksha (सांस्कृतिक वृक्ष )
Share
Author: S. D. Mahajan
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सांस्कृतिक वृक्ष भारतीय संस्कृती निसर्गसंवर्धक आणि निसर्गपूजक आहे. भारताच्या निरनिराळ्या भागातील तीस पूजनीय वृक्षजातींचा परिचय या पुस्तकात करून दिला गेला आहे. या वृक्षांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक बाबी जितक्या त्या वृक्षांच्या वैशिष्ट्यांशी निगडीत आहेत, तितक्याच मनोरंजकही आहेत. उदाहरणार्थ दोन वृक्षांचा विवाह समारंभ साजरा करणे, किंवा एखाद्या वृक्षाला देवत्व बहाल करून त्याचे मंदिर उभारणे आणि पूजा व आरती करणे, नक्षत्र वृक्षांची संकल्पना किंवा प्रत्येक राशीसाठी एका आराध्य वृक्षजातीची योजना करणे यांमुळे त्या वृक्षजातींचे संरक्षण व संवर्धन घडून आणणे साध्य होत असणार, साध्य झालेलेच आहे. वृक्षलागवड आणि वृक्षशेती यासारख्या कार्यक्रमात सांस्कृतिक वृक्षांचा आवर्जून समावेश केला जावा अशी अपेक्षा आहे.