Akshardhara Book Gallery
Sant Kabir (संत कबीर)
Sant Kabir (संत कबीर)
Couldn't load pickup availability
Author: Dinkar Vishnu Kakade
Share
Publisher: Sanskruti Prakashan
Pages: 175
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
संत कबीर
दिनकर विष्णू काकडे हे उत्तम चरित्रकार आहेत, त्यांची चरित्रपर अनेक पुस्तकें प्रकाशित आहेत. 'संत कबीर' हे अत्यंत माहितीपूर्ण, चिंतनशील असे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. कबीर मानतवतावादी, प्रतिभावंत, अलौकिक, ज्ञानी सत्पुरुष होते. त्यांनी कोणत्याही जातीधर्माचा, पंथाचा पुरस्कार केला नाही. 'माणूस' हा त्यांच्या विचारात, विवेकात केंद्रस्थानी राहिला. मानवकल्याणासाठी समाजातील वाईट प्रथांवर ते प्रहार करीत राहिले. ईश्वर हा निर्गुण, निराकार, निर्मळ, निर्लेप, निरंतर आहे. तो गुणरहित, अनादि, अमर्याद, सर्वव्यापी आहे. त्याला कुठल्याच संकल्पनेत बांधू नका. हा संदेश कबीरांनी दिला. सामाजिक प्रबोधन हे त्यांचे ध्येय होते. सामाजिक, धार्मिक व्यंगावर ते बोट ठेवत. मनुष्यच वाणीतून व्यक्त होऊ शकतो. 'वाणी' हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा उपयोग चांगला केला पाहिजे. असा संदेश ते देत राहिले. समाजातील अंधश्रद्धांवर त्यांनी कडाडून प्रहार केले. कबीरांचे दोहे म्हणजे जीवन यशस्वी करण्याचे मंत्र आहेत. दुर्दैवाने मराठीत कबीरांवर फारसे लेखन झाले नाही. दिनकर काकडे यांचे हे पुस्तक यासाठी महत्त्वाचे आहे. - सुनिताराजे पवार (प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे)
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन
