Akshardhara Book Gallery
Sanvidhan Bhan (संविधान भान)
Sanvidhan Bhan (संविधान भान)
Share
Couldn't load pickup availability
Author: Shriranjan Awate
Publisher: Rohan Prakashan
Pages: 520
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
संविधान भान
संविधानकर्त्यांचे शपथपत्र होते मानवी मूल्यांसाठी. नेहरुंनी सांगितलेल्या नियतीच्या काव्यात्म करारासाठी. गांधींच्या 'वैष्णव जन तो तेणे कहिए' म्हणणाऱ्या भारतासाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या समताधिष्ठित समाजासाठी. ताठ मानेने जगता येईल, अशा टागोरांच्या भीतिशून्य समाजासाठी. साने गुरुर्जीच्या प्रेमाचा धर्म सांगणाऱ्या बलशाली भारतासाठी. दाक्षायणी वेलायुधनच्या गावकुसाबाहेरच्या आभाळासाठी. जयपालसिंग मुंडांच्या आदिवासी पाड्यातल्या 'उलगुलान' साठी. मौलाना आझादांच्या 'गंगा जमनी तहजीब' सांगत शिक्षणाची कास धरणाऱ्या इंद्रधनुषी भारतासाठी. सावित्रीबाईंच्या शाळेचा रस्ता अधिक प्रशस्त होण्यासाठी. बुद्धाच्या पिंपळासाठी. माणसातला ईश्वर जागवणाऱ्या गुरू नानकांसाठी. खुल्या दिलाने माफ करणाऱ्या येशूसाठी. सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणाऱ्या कबीरासाठी बाजाराच्या मधोमध उभं राहून संत रवीदासांच्या बेगमपुऱ्यासाठी. तुकोबाची गाथा तारणाऱ्या इंद्रायणीसाठी आणि चेतना चिंतामणीच्या गावाचा रस्ता सांगणाऱ्या ज्ञानोबासाठी. या शपथपत्राला जागण्यासाठीचा हा जेंटल रिमांइडर !
लेखक. श्रीरंजन आवटे
प्रकाशक. रोहन प्रकाशन
