Akshardhara Book Gallery
SARAKARI DAVAKHANA PART 2 (सरकारी दवाखाना भाग 2)
SARAKARI DAVAKHANA PART 2 (सरकारी दवाखाना भाग 2)
Couldn't load pickup availability
Author: Prakash Suryakant Koyade
Share
Publisher: Ellora Publication
Pages: 351
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
SARAKARI DAVAKHANA 2 (सरकारी दवाखाना भाग 2)
"मला माफ कर..." नवऱ्याच्या ओठातून शब्द बाहेर पडले.
ते ऐकून तिनं नवऱ्याचा थरथरता हात तिच्या थकलेल्या हातात घेतला आणि अलगद आपल्या पोटावर ठेवला. आठ महिन्यांचा उंचवटा अजूनही तसाच होता.....
तिचा हात तिथेच स्थिरावला. तिनं आपल्या थकलेल्या नजरेनं नवऱ्याच्या डोळ्यांत खोलवर पाहिलं. ती काहीतरी सांगू पाहत होती....
नवऱ्यानं पुढे होत तो हात आपल्या हातात घेतला. पोटाच्या उंचवट्यातली हालचाल कधीच थांबली होती.....
एक भयाण शांतता त्या वातावरणात पसरली. डॉक्टर, कर्मचारी, सगळेच स्तब्ध उभे होते..... आयसीयूचा श्वास थबकला होता.....
आणि नवऱ्याच्या तोंडून एकच टाहो बाहेर पडला....
"आपलं बाळ गेलं गं....".
त्या एका टाहोने सरकारी दवाखान्याचा आयसीयू थरारला.....
ग्लानी येत असलेल्या बायकोच्या डोळ्यांतून दोन उष्ण थेंब दोन्ही गालांवरून घरंगळले.... तिचे डोळे तसेच उघडे राहिले... अश्रू पूर्ण ओघळण्याआधीच तिचा प्राण निघून गेला होता! फरशीवर बसून बायकोच्या निर्जीव देहाकडे पाहत तो जनावरासारखा ओरडून रडू लागला..... "आपण काय करून बसलो..." म्हणून स्वतःच्याच तोंडात मारून घेऊ लागला.....
कोण बरोबर? कोण चूक? याला आता काही अर्थ उरला नव्हता... उरला होता तो फक्त पश्चात्ताप! एक भांडण संपलं होतं... फार मोठी किंमत मोजून!
लेखक: डॉ.प्रकाश सूर्यकांत कोयाडे
