Akshardhara Book Gallery
Sattekadun Satyakade (सत्तेकडून सत्याकडे)
Sattekadun Satyakade (सत्तेकडून सत्याकडे)
Share
Couldn't load pickup availability
Author: Suresh Dwadashiwar
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 150
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सत्तेकडून सत्याकडे
सबलांविरुद्ध दुर्बलांचा आवाज उठविण्याचा पहिला प्रयत्न चार्वाकांनी केला. पुढे बुद्ध व महावीराने त्यांच्या आवाजात आपला सूर मिसळला. त्याच काळात थेल्स, पायथागोर, सॉक्रेटिस, प्लेटोलाही झाले. येशूने सेवाधर्म आणला. या साऱ्यांनी चार्वाकांचे ध्वज उंचावले. मुस्लिम राजवटीत सुफी संतांनी माणुसकीचा संदेश सांगितले. त्यातला कुणी अद्वैत तर कुणी द्वैत म्हंटले. पण माणुसकीचा त्यांचा संदेश एकच होता.
पुढे संत व महात्मे आले. कबिरांपासून आयवाळ संतांपर्यंत, ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत आणि पुढे आगरकरांपासून गांधी व आंबेडकरांपर्यंत साऱ्यांनी अंत्योदयाचा व माणसाच्या उन्नयनाचा मार्ग सांगितला. ही परंपरा थांबली नाही. जागतिक, राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरही त्यांचे अवतार येताच राहिले. या साऱ्यांनी माणसांच्या एकात्मतेएवढाच त्यांच्यातील समतेचा मार्ग सांगितला. कारण पूर्वीची सारी परंपरा विषमतेची होती. तीत जुलूम होते, हिंसाचार, नरसंहार आणि बलात्कार होते.
तरीही माणुसकीचा आवाज शमला नाही. आज एवढी शतके झाली, लोक सम्राटांना विसरले. त्यांची राज्ये विस्मरणात गेली. साऱ्या जगाच्या आठवणीत फक्त हे महात्मे राहिले आणि ते पुढेही राहणार आहेत. त्यांच्या त्यागाची आणि अखेरच्या विजयाची ही कथा.
प्रकाशक. मनोविकास प्रकाशन
लेखक. सुरेश द्वादशीवार
