Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Seetayan (सीतायन ) By K R Shrinivas Iyengar / Rekha Sathaye

Seetayan (सीतायन ) By K R Shrinivas Iyengar / Rekha Sathaye

Regular price Rs.539.10
Regular price Rs.599.00 Sale price Rs.539.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher: Book Ganga Publications

Pages: 438

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Rekha Sathaye

Seetayan (सीतायन )

Author :  K R Shrinivas Iyengar / Rekha Sathaye

भूमीतून प्रकटली आणि भूमीतच विसावली. या दोन घटनांमधला लेखाजोखा म्हणजे हे महाकाव्य. सीता- या दोन अक्षरांमध्ये संपूर्ण स्त्रीत्व सामावले आहे. हे काव्य आहे त्या अगणित स्त्रियांचे, ज्यांच्यात सीतेचा अंश आहे. जनकाला पितृत्वाचा आनंद देणारी भूसुता जानकी; रामासोबत विवाह करून आलेली प्रेमळ वैदेही; पित्याच्या वरदानाचा मान ठेवून वनवासाचा स्वीकार केलेल्या रामासोबत जाणारी पतिव्रता सीता; अपहरण झाल्यावर अशोकवनात सिम्पुसा वृक्षाखाली आपल्या प्रिय पतीची प्रतीक्षा करणारी रामप्रिया; राक्षस पर्वाच्या विनाशाची कारण ठरलेली नवक्षितिजनिर्माती क्षितिजा; रामाच्या संशयाच्या बाणाने घायाळ होऊन अग्निपरीक्षा देणारी धीरोदात्त मैथिली; राज्याभिषेकानंतर समाजाच्या भीतीने रामाने आजन्म त्याग केलेली संयमी विदेही; गर्भात वाढणाऱ्या रामाच्या वंशासाठी आश्रमवासिनी झालेली आई लाक्षकी; आपल्या जुळ्या मुलांच्या मुखातून ऐकलेल्या गीतातून रामाला परत भेटलेली त्याची प्राणप्रिय सखी; आणि शेवटी, संपूर्ण सृष्टीला जन्म देणारी, पालनपोषण करणारी, संकटे झेलून सदाहरित राहणाऱ्या भूमातेच्या निवासस्थानी विसावलेली तिचीच कन्या भूमिजा. स्त्रीत्व म्हणजे अनंत; पण त्या अनंतालाही कुठेतरी अंत आहे. आपल्या पवित्र प्रेमाला सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा ती परीक्षा देण्यास तयार झाली; पण या वेळेस शेवटची. अशा ह्या माता सीतेचे हे अद्भुत, अलौकिक, अतृप्त महाकाव्य म्हणजेच ‘सीतायन’

View full details