Akshardhara Book Gallery
Shabd Navyane Vahu Lagtil (शब्द नव्याने वाहू लागतील ...)
Shabd Navyane Vahu Lagtil (शब्द नव्याने वाहू लागतील ...)
Share
Couldn't load pickup availability
Author: लेखक: द.भा. धामणस्कर
Publisher: Mauj Prakahan Gruh
Pages: 181
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Shabd Navyane Vahu Lagtil (शब्द नव्याने वाहू लागतील ...)
..काव्यनिर्मिती ही एक साधना आहे असं मी मानतो. वाचन, मनन, निरीक्षण ही या साधनेची सामग्री असते आणि एक कलात्मक आनंदाची निर्मिती हे तिचं ईप्सित असतं. आत्मप्रचिती हाच कवितेचा मुख्य आधार असला पाहिजे. समर्थांनी दासबोधाच्या सुरुवातीस हेच म्हटलंय. तुकाराम तर सगळीच आत्मप्रचिती आहे.
कवितेला कुठलाच विषय वर्ज्य नाही. कवीला विशेष आवडला, तोच त्याचा विषय. आपल्या अनुभवात नाही अशा विषयावर कविता लिहू नये. कविता लिहायची ऊर्मी आली तरच कविता लिहिण्यास शांत चित्ताने बसावं. आपलं सर्वस्व तिच्यात ओतावं. कविता लिहून झाल्यावर ती स्वत:शीच परत परत वाचणं; आवश्यक ते बदल करून ती परत परत लिहिणं आपोआप होत असतं. कविता चांगली झाली आहे याची स्वत:ला खात्री पटल्यावर जवळच्या कविताप्रेमी मित्रांना ती दाखवावी; त्यांचे अभिप्राय जाणून घ्यावेत. पण स्तुतीने हुरळून जाऊन प्रसिद्धीची घाई करू नये. मी हेच केलं....
लेखक: द.भा. धामणस्कर
