Akshardhara Book Gallery
Shabda Nishabda (शब्द निःशब्द)
Shabda Nishabda (शब्द निःशब्द)
Couldn't load pickup availability
Author: Vinaya Desai
Share
Publisher: Anubandh Prakashan
Pages: 116
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शब्द निःशब्द
संवेदनशील लेखिका, कर्णबधिर मुला-मुलींसाठी योगदान देणाऱ्या विशेष शिक्षिका, उत्तम मुलाखतकार, आणि आपल्या रसाळ निवेदनातून कार्यक्रमाची उंची वाढविणाऱ्या निवेदिका म्हणून त्या सर्वांना सुपरिचित आहेत. गौतम बुद्ध म्हणत, 'शब्द उच्चारण्यापूर्वी आपण त्यांचे स्वामी असतो उच्चारल्यानंतर ते आपले स्वामी होतात.' प्रसिद्ध गोमंतक कवी सोहिरोबा आंबिये म्हणत, 'विवेकाची ठरेल ओल। जे बोलायाचे ते ऐसे बोल । आपुले मते उगीच चिखल । कालवू नको रे ।। शब्दांमध्ये एक विलक्षण शक्ती असते. शब्दशक्तीच्या अफाट ताकदीचा विलक्षण आविष्कार घडविणारेही विनयाताईंनी पाहिले आणि निःशब्दाचे जगही त्यांनी अनुभवले. त्यातून शब्दांच्या वापराचे मोल त्यांना समजले. या शब्दविवेकाची त्यांनी जाणत्या वयापासून ते आजपर्यंत कास धरली म्हणून शब्द-निःशब्दच्या अवकाशातले त्या नेमकेपणाने टिपून शब्दबद्ध करू शकल्या. तरल संवेदना, सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि घेतलेला अनुभव लेखनातून मांडण्याची खास 'विनया शैली' यामुळे विनयाताईचे लेखन वाचकांना गुंतवून ठेवणारे आहे. हे लेख छोटे आहेत पण 'गागर मे सागर' या उक्तीप्रमाणे आशयाला न्याय देणारे आहेत. अल्पाक्षरी तरीही अर्थबहुल असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. चोखंदळ वाचकांना विनयाताईंचे 'शब्द निःशब्द' हे पुस्तक आवडेल, याची मला खात्री आहे.
लेखक. विनय देसाई
प्रकाशक. अनुबंध प्रकाशन
