Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Shahir D. N. GavhankarSamagra Sahitya ( शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य )

Shahir D. N. GavhankarSamagra Sahitya ( शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Pooja Parag Samant

Publisher: Lokvangmay Grih Prakashan

Pages: 203

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:---

शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य

'लाल निशाणे आमुची, शोभा विळा हातोड्याची' आणि 'धरतीची आम्ही लेकरं' अशी बेधुंद गाणी गाणाऱ्या शाहीर द. ना. गव्हाणकर यांचे वाङ्मय लोकवाङ्मय गृहाच्या वतीने प्रथमतःच प्रकाशित होते आहे. गव्हाणकर यांच्या लोकनाट्यांचा, प्रबोधनशाहिरीचा व काही गद्य लेखनाचा समावेश या खंडात आहे. गव्हाणकर यांचा लाल बावटा पथक व मार्क्सवादी पक्षाशी जवळचा संबंध होता. त्यांच्या नाटकाचे स्वरूप जरी प्रचारी वाटले तरी त्यांची नाटके सामाजिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची लोकनाटके आहेत. प्रबोधननाटके म्हणून त्यांना विशेष महत्त्व आहे. या लोकनाट्याचे नाते महात्मा फुले यांच्या नाटकाशी आहे. अण्णा भाऊ, अमर शेख आणि गव्हाणकर यांनी या लोकनाटकांचा वापर आधुनिक दृष्टीने केला. त्यासाठी त्यांनी 'नवे तमाशे' हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला आहे. त्यांनी पूर्वपरंपरेतील या कलाप्रकारातील दैवी दृष्टी काढून टाकून त्याचा वापर सामाजिक प्रबोधनासाठी केला. गव्हाणकरांची ही लोकनाट्ये प्रश्नकेंद्री आहेत. या नाटकांत फॅण्टसीचा सर्जनशील वापर असून या नाटकांना स्वातंत्र्यानंतरच्या भारताचे तपासणी नाटक (इन्क्वायरी नाटक) म्हणून त्यांना असाधारण असे महत्त्व आहे. गव्हाणकरांच्या या वाङ्मयातून तत्कालीन सामाजिक चळवळी, वर्ग जाणीव, विविध प्रकारचे लढे, मार्क्सवादी विचारदृष्टी व वाङ्मयस्वरूपावर नव्याने प्रकाश पडेल. त्याचबरोबर गव्हाणकरांच्या वाङ्मयाचे स्वरूप, त्यातील राजकीय, सामाजिक आशय आकळता येईल. गव्हाणकरांच्या लोकनाट्यातील विषय हे आजही तेवढेच प्रस्तुत आहेत. त्यांच्या वाङ्मयात भारताच्या अस्वस्थ कालखंडाचे व भविष्यातल्या समतास्वप्नाचे चित्र होते. या निमित्ताने गव्हाणकरांच्या लोकनाट्ये, शाहिरी त्यामधील प्रयोगशीलता, विचारविश्व, राजकीय भान व प्रबोधन चळवळी यातील आंतरसंबंधाचा नव्याने विचार होईल. द. ना. गव्हाणकरांच्या वाङ्मयाची प्रबोधनभेट वाचक, कार्यकर्ते आणि अभ्यासकांना निश्चितच भावेल. - रणधीर शिंदे
प्रकाशक :  लोकवाङ्मय गृह 
View full details