Akshardhara Book Gallery
Shankhanad (शंखनाद)
Shankhanad (शंखनाद)
Couldn't load pickup availability
Author: Madhav Basavante
Share
Publisher: Shabdalay Prakashan
Pages: 120
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Shankhanad (शंखनाद)
डॉ. माधव बसवंते यांचा 'शंखनाद' हा कवितासंग्रह विमोचित होत आहे. विधानात्मक शैली अशी ओळख असलेली त्यांची कविता आजच्या व्यवस्थेचे वास्तव रूप अधोरेखित करते. जात्यंधता, धर्मांधता ही मानवतेला लागलेली कीड समूळ नष्ट व्हावी अशी आशा बाळगणारे हे कविमन जाणीव-नेणिवेच्या पातळीवर लीलया अभिव्यक्त होत आहे. ज्ञानमंदिरात जेव्हा न्यायदेवताच फितूर होते, तेव्हा न्यायाच्या प्राधिकरणाचे प्रारूप पूर्णतः बदललेले असते. हे जळजळित वास्तव या कवितांमधून प्रकट होते. देशभक्तीचा खोटा गणवेश परिधान केल्यावर लोकशाहीचा चौथा स्तंभ अनायास राजकीय दावणीला बांधला जातो, तर शहरातील महात्म्यांचे पुतळे भर चौकात उपोषणावर बसतात, हे प्रतीक अत्यंत बोलके आहे.
लेखक: डॉ. माधव बसवंते
