Akshardhara Book Gallery
Sharyat ( शर्यत )
Sharyat ( शर्यत )
Share
Couldn't load pickup availability
Author: Eshwar Tribak Aagam
Publisher: Sadicha Publishing House
Pages: 266
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
शर्यत
प्रकाशक : सदिच्छा पब्लिशिंग हाऊस

मराठी साहित्यामध्ये पहिल्यांदाच या विषयावर लिहिलेली ही कादंबरी. लेखक नवीन असले तरीही त्यांची लेखणाची उत्तम जाण आपल्याला कुठेही नवखेपणा जाणवत नाही. अतिशय सुंदर, सहज आणि ओघवती भाषाशैली. कादंबरी हातात पडली आणि मुखपृष्ठावरच्या सुंदर बैलजोडी वरून नजर हटता हटेना. एक वेगळा विषय वाचायला मिळणार म्हणून वाचायला घेतलेली कादंबरी वाचता वाचता मनावर पकड घेऊ लागली. सुरूवातीला वाटत होतं की, 266 पानांची कादंबरी होईल का वाचून? पण जसं जशी पानं वाचत जाऊ तसं तसे आपण कथेमधे गुंतून जातो. कादंबरीचा फ्लॅशबॅक जबरदस्त आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबर्यांची प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कधी नकळत हसायला तर कधी डोळ्यांत पाणी आणायला लावणारे प्रसंग लेखकाने अतिशय प्रगल्भपणे मांडले आहेत. बैलगाडा शर्यतीचे प्रसंग तर अंगावर येतात. क्षणा क्षणाला काळजाचा ठोका वाढवतात. असं वाटतं, जसं काय आपणच त्या मैदानात, त्या लोकांच्या गर्दीत उभे राहून बैलगाडा शर्यत तर पाहत नाही ना!
लेखकाने स्वतः पुस्तकाची मांडणी केलेली पाहून खरच कौतुक वाटलं. नेटक आणि नेमकं लेखन, तसेच कुठेही रटाळवाण किंवा कंटाळवाण लेखन होणार नाही याची लेखकाने पुरेपूर काळजी घेतल्याचं जाणवतं. कथेचा बाज ग्रामीण असल्याने ग्रामीण बोलीभाषेतील संवाद तुम्हाला तुमच्या गावची आठवण नक्कीच करून देतील. पुस्तक जेव्हा ७०-८० टक्के वाचून होतं, तेव्हा मनाला हुरहूर वाटत राहते की, कथा संपूच नये. कादंबरी संपवून जेव्हा खाली ठेवली तेव्हा एखादा चित्रपटच पाहून आल्यासारखं वाटत होतं. लेखक ईश्वर आगम यांना पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा...! नक्की वाचावे आणि आपल्या संग्रही ठेवावे असे पुस्तक.
लेखकाची स्तुति करावी तेवढी कमीच आहे. अतिशय सुंदर, सहज लेखन. बैलगाडा शर्यत म्हणजे माझ्या आवडीचा विषय. लेखक पुन्हा एकदा त्या काळात आपल्याला घेऊन जाण्यात यशस्वी झाला आहे. त्या काळातील माहीत नसलेल्या हिंदकेसरी बैलांची ओळख झाली तसेच आजच्या आघाडीच्या बैलांचीही माहिती झाली. नक्की वाचावे असे पुस्तक.
माझ्या माहितीपैकी शर्यत हे बैलगाडा शर्यत या विषयावर आधारीत एकमेव पुस्तक आहे.
ग्रामीण कादंबऱ्या आजवर अनेक आल्या गाजल्याही. पण बैलगाडा शर्यत हा विषय दुर्लक्षितच राहिला. आणि याच विषयावर मराठी साहित्य विश्वातील ही पहिली कादंबरी. सहज, सुंदर अशी भाषा शैली. त्याचबरोबर ग्रामीण जीवन, सण, उत्सव तसेच आयुष्यावर आधारित असलेली आणि बैलगाडा शर्यत हा मुख्य विषय घेऊन लिहिलेली ही अतिशय रंजक, थरारक आणि उत्कंठावर्धक अशी कादंबरी प्रत्येकाने आवर्जून वाचावी, अनुभवावी आणि आपल्या संग्रही ठेवावी. ही नुसती कादंबरी नव्हे, हा बैलगाडा शर्यतीचा इतिहास आहे... माहितीचा एक अनमोल ठेवा आहे.