Shastradnya Aajichya Goshti ( शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी )
Shastradnya Aajichya Goshti ( शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी )
Low stock: 8 left
Author:
Publisher:
Pages: 71
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
झंप्या, भुपी आणि त्यांची आजी अशा त्रिकुटाच्या या गोष्टी आहेत. तिघांचं छान मेतकूट जमलं आहे. पण ही आजी साधीसुधी आजी नाही. ही आहे शास्त्रज्ञ आजी. मुलं तिला गूगल आजीसुद्धा म्हणतात. कारण तिला वाट्टेल त्या प्रश्नांची उत्तरे माहीत असतात. पण माहीत असतात याचा अर्थ ती आपल्या नातवंडांना उत्तरं सांगून टाकते असं मात्र नाही. ती त्यांना प्रश्न विचारते, कोडी घालते, उत्तरं शोधायला मदत करते. आणि एकूणच विचार कसा करावा ? हे गोष्टी सांगता सांगता नकळत शिकवत जाते. या झंप्या, भुपी आणि आजीच्या खुसखुशीत गोष्टी वाचून तुम्हालाही झंप्या किंवा भुपी व्हावं असं वाटेल. मनोमन आपलीही आजी शास्त्रज्ञ आजीसारखी असावी असे वाटेल. मग बघा तर वाचून, शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी !
या पुस्तकाचे लेखक : डॉ. शंतनू अभ्यंकर, प्रकाशक : लोकवाङ्मय गृह