Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sheti Vyavsayateel Mandi Aani Sandhi (शेती व्यवसायातील मंदी आणि संधी)

Sheti Vyavsayateel Mandi Aani Sandhi (शेती व्यवसायातील मंदी आणि संधी)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.225.00 Sale price Rs.225.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Mukundrao Gaikwad

Publisher: Continental Prakashan

Pages: 215

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

शेती व्यवसायातील मंदी आणि संधी

भारतासारख्या जाती-जमातीमध्ये विभागलेल्या देशाला सामाजिक- आर्थिक गतिशीलतेचे पहिले स्वप्न दिले ते लोकशाहीने आणि दुसरे जागतिकीकरणाने.
मुळात जागतिकीकरण ही निव्वळ अर्थकारणाची व्यवस्था नाही. ती एक नवी संस्कृती आहे. ती नवी विचारधारा आहे. ती नवी ज्ञानप्रणाली आहे आणि तळागाळातील वंचित घटकांसाठी सामाजिक गतिशीलतेची प्रभावी संधी आहे.
स्थलांतर हे ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाचे, असे आईन्स्टाईन म्हणाला त्याचा प्रत्यय अमेरिकेत येतो. कधी नव्हे ती मंदीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळत आहे. अमेरिकेची जगातील प्रतिमा कोसळत आहे. तरुण मुले बेरोजगार होत आहेत. अमेरिका भारत चीनच्या तुलनेने दुसऱ्या स्थानावर घसरणार याची खंत तेथील सर्वांनाच वाटू लागली आहे.
अमेरिका हा जगाचा 'मेल्टिंग पॉट' असल्याने जगातील नवे प्रवाह या देशात सर्वप्रथम दिसून येतात. बऱ्याच नको त्या लोकांच्या हातात अतिरिक्त पैसा येतो. जेव्हा भांडवल बाजारात मोठ्या प्रमाणात जुगारी व्यवहार सुरू होतात तेंव्हा त्यातून मंदीसारखे आर्थिक आरिष्ट निर्माण होते. भारतातील शेतकऱ्यांना दिवाळे काढता येत नाही म्हणून शेतीधंद्यात मंदी नाही असे माध्यमातील जाणते लोक म्हणतात. हे प्रतिपादन शेतीविषयाबद्दल विद्वानांचे अज्ञान दर्शवते. मंदीचे संधीत रूपांतर करून भारत महासत्ता होऊ शकेल यासाठी या पुस्तकाचा शेतकरी, राज्यकर्ते, विद्यार्थी, अर्थशास्त्रज्ञ यांनी अभ्यास करणे गरजेचे आहे.
प्रा. डॉ. मुकुंद गायकवाड वयाच्या ७० व्या वर्षी, परदेशात, खेड्यापाड्यात जाऊन, शेतकऱ्यांचे प्रबोधन करतात. आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके या सर्व उपलब्ध माध्यमांचा उपयोग करतात. ते शेतकरी समाजाविषयी असणाऱ्या प्रेमापोटी, बांधिलकीपोटी, त्या समाजावर असणाऱ्या निस्सिम श्रद्धेमुळेच. केवळ उत्कट इच्छेने कामे होत नसतात, त्यासाठी कर्ते पुरुष पुढे यावे लागतात. तरच भारत महासत्ता होऊ शकेल.

लेखक : प्रा. डॉ. मुकुंदराव गायकवाड

View full details