Akshardhara Book Gallery
Shetkaryanche Babasaheb (शेतकऱ्यांचे बाबासाहेब)
Shetkaryanche Babasaheb (शेतकऱ्यांचे बाबासाहेब)
Share
Couldn't load pickup availability
Author: Purushottam Jadhav
Publisher: Jijai Prakashan
Pages: 143
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शेतकऱ्यांचे बाबासाहेब
डॉ. बाबासाहेब म्हणजे केवळ संविधान नाही; बाबासाहेब म्हणजे केवळ दलितांचे नेते नाहीत.
शेतकऱ्यांच्या घामाने हा देश पिकतो, पण त्यांच्या डोळ्यांत मात्र कायम अश्रू असतात. बाबासाहेब म्हणजे त्या कोट्यवधी शेतकऱ्यांचाही आवाज आहे.
१९१७ साली कोलंबिया विद्यापीठात बसून एका पंचवीस वर्षांच्या तरुणाने भारतीय शेतकऱ्यांच्या जमीन विखंडनाचा प्रश्न जगासमोर मांडला. तेव्हापासून ते केंद्रीय जल आयोगाच्या स्थापनेपर्यंत, खोती निर्मूलनापासून ते नदीजोड प्रकल्पाच्या संकल्पनेपर्यंत, स्त्री कामगारांच्या समान वेतनापासून ते ग्रामीण औद्योगिकीकरणाच्या स्वप्नापर्यंत, बाबासाहेबांनी शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण वंचितांसाठी जे विचारले, जे लढले आणि जे घडवले, त्याची ही अपूर्व गाथा आहे. जमीन कसणाऱ्याच्या हाती जमीन असावी, शेताला पाणी असावे, घरी वीज असावी, मुलाला गावातच रोजगार असावा आणि मालाला न्याय्य भाव मिळावा, हे बाबासाहेबांचे स्वप्न आजही अपूर्णच आहे. ते पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या पिढीची आहे.
जमीन त्याची, पाणी त्याचे, कष्टाचे फळ त्यालाच मिळावे । भीमाने पेरले समतेचे बीज, आता आपण ते फुलवावे ॥
लेखक. पुरुषोत्तम जाधव
प्रकाशक. जिजाई प्रकाशन
