Akshardhara Book Gallery
Shreednyaneshwari Dainandin Nityapath (श्रीज्ञानेश्वरी दैनंदिन नित्यपाठ)
Shreednyaneshwari Dainandin Nityapath (श्रीज्ञानेश्वरी दैनंदिन नित्यपाठ)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher: Sakal Prakashan
Pages: 588
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
श्रीज्ञानेश्वरी दैनंदिन नित्यपाठ
पारमार्थिक जगात अनेक संत, पंथ व ग्रंथ निर्माण झाले. त्यात 'ज्ञानेश्वरी' हे शीर्षस्थानी आहे.
जगातल्या अनेक भाषेत ज्ञानेश्वरीचे भाषांतर झाले आहे. त्यामुळे ती जगभरातील सर्व विद्वानांचाही
अभ्यासाचा विषय बनली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये फक्त तत्त्वज्ञान नाही, तर तत्त्वरस आहे. या रसाची
वाचकांना प्रतिदिन अनुभूती यावी, यासाठी या ग्रंथात विशेष रचना केली आहे. याद्वारे वाचकांना वर्षाच्या
३६५ दिवसांत ज्ञानेश्वरीचे संपूर्ण पठण करणे शक्य होईल.
सात शतके झाली; परंतु ज्ञानेश्वरीच्या तोडीचा ग्रंथ जगातील कोणत्याही भाषेत निर्माण झालेला नाही.
ज्ञानाचे स्वरूप नित्यनूतन असल्यामुळे पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी वाचली, तरी नवीन नवीन अर्थ उलगडत
जातात. ३६५ दिवस रोज ज्ञानेश्वरी वाचताना वाचकांना अंतरिक चैतन्याची अनुभूती येईल, मनशांती
लाभेल, मनातील विचारांमध्ये सकारात्मकता येईल, जीवनाच्या अनेक समस्या सुटायला मदत होईल
व आत्मउन्नतीचा मार्ग सापडेल.
'श्रीज्ञानेश्वरी दैनंदिन नित्यपाठ' हा ग्रंथ साधकांच्या आत्म्यासाठी तत्त्वरसाचे जणू ठिबक सिंचनच आहे.
याद्वारे साधकांना पारमार्थिक सुखाचा लाभ होईल, यात काही शंका नाही. या ग्रंथाद्वारे रोज माउली
वाचकांना भेटतील, त्यांच्याशी बोलतील आणि त्यांना आशीर्वादही देतील. माउलींची सेवा आणि
भाविकांचा दुवा प्राप्त व्हावा, हाच या ग्रंथामागचा खरा उद्देश.
संकलन : निनाद शुक्ल
