Akshardhara Book Gallery
SHRI SAMARTHA RAMDAS AANI RAMDASI SAMPRADAY (श्री समर्थ रामदास आणि रामदासी संप्रदाय)
SHRI SAMARTHA RAMDAS AANI RAMDASI SAMPRADAY (श्री समर्थ रामदास आणि रामदासी संप्रदाय)
Share
Couldn't load pickup availability
Author: MADHUKAR JOSHI
Publisher: APRANT PRAKASHAN
Pages: 392
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:----
श्री समर्थ रामदास आणि रामदासी संप्रदाय
प्रा. मधुकर रामदास जोशी, एम. ए., पीएच.डी. नागपुर विद्यापीठात अध्ययन व अध्यापनाचे काम करुन प्रपाठक पदावरुन निवृत्त झाले. आपल्या अध्यापन काळात त्यांनी अनेकांना एम. फील. व पीएच. डी. पदवीसाठी मार्गदर्शन केले. आजवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पीएच. डी. पदवी प्राप्त झाली. याशिवाय पीएच. डी. परीक्षेचे परीक्षक म्हणूनही त्यांनी अनेक विद्यापीठात काम केले. त्यांच्या प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास पुरवणीसह प्रसिद्ध आहे. याशिवाय नाथ संप्रदाय हा त्यांचा ग्रंथ मान्यता प्राप्त असून समग्र रामदास व समग्र तुकाराम हे त्यांचे संपादित ग्रंथ त्यांच्या मूलभूत संशोधनाची ग्वाही देणारे आहेत. श्री विठ्ठल आणि पंढरपूर, मनोहर अंबानगरी, ज्ञानेश्वर कन्या, ज्ञानेश्वरी संशोधन, दत्तगुरुंचे दोन अवतार, ज्ञानेश्वरीचरित्र संशोधन अशा मराठी संत परंपरेतील ग्रंथ संपदेबरोबर दासबोध व गुरुचरित्र या दोन प्रमाणभूत ग्रंथांचे संशोधनपूर्वक संपादन करुन मराठी संत, त्यांच्या चरित्रगाथा, त्यांची परंपरा व ग्रंथसंपदा अशा आपल्या संशोधनाने त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. विविध संतपरंपरा व संप्रदाय वाङ्मयीन समीक्षा वाङ्मयेतिहासाप्रमाणेच हस्तलिखिते व हस्तलिखीतशास्त्र या विद्याक्षेत्रात त्यांनी केलेले मूलगामी संशोधन लक्षणीय असुन संहिता पाठाचा शोध व संपादकीय समस्या आणि प्रमेयाच्या अध्ययनांत त्यांचा हातखंडा आहे. मराठी वाङ्मय व संशोधन क्षेत्रात केलेल्या अजोड कार्यामुळे आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच अत्यंत प्रतिष्ठेचा व सर्वोच्च असलेला २०१८-१९ चा ज्ञानोबा-तुकाराम हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने त्यांना देऊन त्यांचा गौरव केला आहे.
लेखक : मधुकर जोशी
प्रकाशन : अपरांत प्रकाशन
