Akshardhara Book Gallery
Shrikant : Bhag 3 V 4 (श्रीकांत भाग : ३ व ४)
Shrikant : Bhag 3 V 4 (श्रीकांत भाग : ३ व ४)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sharchandra Chatopadhyay
Publisher: Sadhana Prakashan
Pages: 341
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Bha. V. (Mama) Varerkar
श्रीकांत भाग : ३ व ४
‘श्रीकांत’ हे नोबेल विजेता साहित्यिक रोमां रोलांचे अत्यंत आवडते पुस्तक होते. ही एक प्रकारची भ्रमणगाथा आहे आणि हे भ्रमण करताना त्याला दिसलेल्या समाजाचे व जीवनाचे दर्शन श्रीकांत घडवतो. गो. नी. दांडेकरांच्या कुण्या एकाची भ्रमणगाथावर याची दाट छाया जाणवते, पण तिथे श्रीकांतमधले अपूर्व व्यक्तिदर्शन नाही व एवढा विशाल पटही नाही. एक प्रकारे हे शरद बाबूंचे आत्मचरित्र आहे. त्यांची भटकण्याची वृत्ती, ब्रह्मदेशातली नोकरी, विचारसरणी, जातिभेदांविषयी तिरस्कार, पारतंत्र्याचा तिटकारा, सहृदय स्वभाव, पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धारिष्ट, मनातली एक प्रकारची उदासीनता हे सर्व ‘आवारा मसीहा’चे जगणे श्रीकांत आणि शरदबाबू या दोघांच्यात समान दिसते.
प्रकाशक. साधना प्रकाशन
मूळ लेखक. शरच्चन्द्र चटोपाध्याय
अनुवादित लेखक. भा. वि. (मामा) वरेकर आत्मचरित्र वरेरककार
