Akshardhara Book Gallery
Shwas (श्वास)
Shwas (श्वास)
Couldn't load pickup availability
Author: Vikram Bhagwat
Share
Publisher: Mihana Publications
Pages: 148
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
श्वास
कोणत्याही गोष्टीच्या जिवंतपणाची खूण म्हणजे श्वास. माणूस असो, कोणतीही विचारधारा असो किंवा निर्मितिप्रक्रिया असो, त्यांचा श्वास चालू असेपर्यंत त्यांचे महत्त्व असते. त्यांच्या श्वासाची लय कमी जास्त होते त्याप्रमाणे त्यातली तत्त्व, घटना, प्रसंग, मानवी नातेसंबंध, स्त्री पुरुष संबंध यांच्या घनता आणि तीव्रतेची लय हलत असते. अशा सर्व गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण, संयमित आविष्कार सुप्रसिद्ध कादंबरीकार विक्रम भागवत यांच्या 'श्वास' या कादंबरीत झाला आहे. या कादंबरीचा नायक 'श्वास' आहे. त्या भोवतीने व्यक्ती, सामाजिक-राजकीय विचारधारा, मानवी नातेसंबंध, स्त्री पुरुष संबंध रूपाने विषय कादंबरीभर फिरत राहतो. म्हणूनच कादंबरीची लय श्वासाच्या लयीसारखी आरोही अवरोही झाली आहे. कादंबरी या साहित्यप्रकारावरील लेखकाची असलेली घट्ट पकड या कादंबरीवर अधिक उठवदारपणे दिसून येते. कादंबरीचे तंत्र, तिचा विषय आशय, तिची भाषा, तिचा आकार, लेखक म्हणून गुंतवणूक आणि तटस्थता या सर्व गुणांनी युक्त अशी 'श्वास' ही कादंबरी वाचकाला स्वतःचे श्वास तपासून पाहण्यासाठी प्रवृत्त करते.
लेखक. विक्रम भागवत
प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन
