Akshardhara Book Gallery
Sindhu sanskruti ani maharashtra (सिंधू संस्कृती आणि महाराष्ट्र )
Sindhu sanskruti ani maharashtra (सिंधू संस्कृती आणि महाराष्ट्र )
Share
Couldn't load pickup availability
Author: Anant Mukund Savant Prabhavalkar
Publisher: Aditi Anant Savant
Pages: 228
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Sindhu sanskruti ani maharashtra (सिंधू संस्कृती आणि महाराष्ट्र )
सिंधू संस्कृतीची मूळ भूमिका ही कोकणातील व्रते, प्रथा आणि परंपरांमध्ये मुरली आहे. गाव रहाटीतील नामानिधानांमध्ये दडली आहे. इथल्या झाडांभोवती अळ्यामधे, शेतांच्या मेरीमध्ये, घराभोवतीच्या गडग्यामध्ये आणि गावातील गड कोट किल्ल्यांमध्ये लपली आहे. गावांमधील शंकराच्या आणि देवीच्या मंदिरांमध्ये, लक्ष्मी-महालक्ष्मी मंदिरामध्ये, नृसिंह-नारायण मंदिरामध्ये, गोठण भागातील गावालदेवांपाशी, गावाबाहेरील भावई व भैरव मंदिरामध्ये घुमते आहे. बारा इर्तिकांच्या, बारा कुळांच्या, बारा वाड्यांतील, बारा वेशीतील, बारा बेवड्यांपाशी वसली आहे. प्रभू, राऊळ, घाडी, राजसत्ता आणि महार या गावरहाटीतील पाच मानकऱ्यांच्या मुखांतून बोलू पाहत आहे. देवळातल्या पंचपरमेश्वरांच्या मूर्त्यांतून, गळलेल्या वीरांच्या वीरगळातील स्मृतींतून आणि कातळात कोरलेल्या शिल्पादींमधून आपल्या समृद्ध प्राचीन इतिहासाला साद घालत आहे.
लेखक :अनंत मुकुंद सावंत प्रभावळकर
प्रकाशिका :अदिती अनंत सावंत
