Akshardhara Book Gallery
Smrutichi Chalata Pane (स्मृतीची चाळता पानें)
Smrutichi Chalata Pane (स्मृतीची चाळता पानें)
Share
Couldn't load pickup availability
Author: V S Khandekar
Publisher: Mehta Publishing House
Pages: 191
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Smrutichi Chalata Pane (स्मृतीची चाळता पानें)
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केलेल्या वि. स. खांडेकरांच्या 'स्मृतीची चाळता पाने' या अप्रकाशित साहित्याच्या संकलनात आत्मपर लेख, आठवणी, पत्रात्मक लघुनिबंध, रूपककथा, वैचारिक लेख आणि व्यक्तिलेखादी आठ विभागांचा समावेश आहे. यात खांडेकरांचे साहित्यिक अनुभव, बालपण व तरुणपणीच्या आठवणी, समाजजीवन, गांधीवाद आणि तत्कालीन राजकारणावर प्रकाश टाकणारे विविध विचारप्रवर्तक व मार्गदर्शक लेख पाहायला मिळतात. प्रत्येक विभागाला संपादकीय जोडले आहे. आत्मपर लेखांमध्ये त्यांच्या पहिल्या पुस्तकापासून ते 'ययाती' कादंबरी आणि कथालेखनापर्यंतचा प्रवास उलगडला आहे. आठवणींच्या विभागात जीवघेणा अपघात, विद्यार्थ्याचा जीव वाचवल्याची घटना आणि ग्रामीण विकासाचे विचार मांडले आहेत. पत्रात्मक लघुनिबंधांमध्ये दादा - भाऊंचा संवाद, गांधीवाद, समाजवास्तव आणि जर्मनीच्या विभाजनाची पार्श्वभूमी दिसून येते. शुभसंदेश व आवाहनांच्या माध्यमातून साहित्य विकास, मानवी मूल्ये आणि तरुणांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. 'स्वातंत्र्यदेवता' या रूपककथेत सामान्य माणसाचे स्थान स्पष्ट केले आहे, तर वैचारिक व व्यक्तिलेखांतून अनुक्रमे रशियाची स्थिती आणि शंकरराव किर्लोस्करांच्या कार्याचा गौरव केला आहे. तसेच वाचकांच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांचाही यामध्ये समावेश आहे.
लेखक: वि.स.खांडेकर
संपादक: डॉ.सुनीलकुमार लवटे
