Akshardhara Book Gallery
Steering (स्टिअरिंग)
Steering (स्टिअरिंग)
Couldn't load pickup availability
Author: Heenakausar Khan
Share
Publisher: Shabdalay Publication House
Pages: 184
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
स्टिअरिंग
ना दिशा ठरवायचा अधिकार असतो, ना मंजिल...
हिनाकौसर खान हिच्या कथा शहर-गाव अशा सीमा लांघून आधुनिक जगातील समाज आणि नातेसंबंधावरच्या पडसादांविषयीच्या आहेत. प्रेम या संकल्पनेवर लेखिकेचं मनापासून प्रेम असावं असं वाटत राहतं. प्रेमातली व्हल्नरेब्लिटी आणि रुमानीपणा दोन्ही कथांत डोकावतात. ओघवती भाषा आणि अनुभवाचा ऐवज कथा वाचताना सतत जाणवत राहतो. मुस्लीम मराठी जगण्याचे अनेक तुकडे त्यात सहज येतात. पण ते केवळ मुस्लीम समाजाचे राहत नाहीत. ते त्यापलीकडे जाऊन कुठल्याही धर्माच्या भारतीय घरातल्या विसंगतीवर बोट ठेवतात. माणसांपेक्षा समाजाचं मोठं होत जाणं सूक्ष्मपणे जाणवत राहतं. हिना कट्टरतेवर नाही तर कठोरतेवर बोलते. तिच्या कथांमधून माणूसपण जागं राहतं.
लेखक : हिनाकौसर खान
