Akshardhara Book Gallery
Sthityantar Bhag 1 (स्थित्यंतर भाग १)
Sthityantar Bhag 1 (स्थित्यंतर भाग १)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vikram Bhagwat
Publisher: Mihana Publications
Pages: 152
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
स्थित्यंतर भाग १
मराठी साहित्यविश्वात राजकीय कादंबऱ्या फारश्या नाहीत. भारताच्या इतिहासात आर्थिक विकेंद्रीकरण, सुलभता आणि पाश्चिमात्त्य गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणे हे स्वर्गीय पंतप्रधान आणि त्या वेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांच्या कारकिर्दीत झाले. इथेच एक नवा मध्यमवर्ग भारतात उदयाला आला. त्याला Aspirational Middle Class असे ही म्हटले गेले. एका बाजूला 'आदर्शवाद' आणि दुसरीकडे 'सत्तेसाठी काहीही' असा दुहेरी पेच भारतीय राजकारणात पडत होता. यात राजकीय पुढारी, पत्रकार, विद्यार्थी, धर्मकारणी, समाजकारणी या सर्वांनी आपापल्या भूमिका वठवल्या आहेत. भारतीय इतिहासातल्या या अनोख्या पर्वाचे चित्रण 'स्थित्यंतर' या कादंबरीत लेखकाने केले आहे. उपभोक्तावाद प्रथमच समाजाला भेडसावू लागला होता. त्याच्याशी सामना कसा करायचा? याचे Aspirational मध्यमवर्गाला पटेल असे उत्तर कुणाजवळ नव्हते. त्याचवेळी धार्मिक केंद्रीकरण होऊ लागले आणि सर्व प्रश्नांना एक वेगळाच आयाम मिळाला. हे ध्रुवीकरण भारताला प्रथमच अनुभवायला मिळत होते आणि त्याच्याशी सामना कसा करायचा? याचे उत्तर समाजशास्त्रज्ञांजवळ नव्हते. हा सर्व पट ताकदीने लेखकाने उलगडून दाखवला आहे. अशी राजकीय कादंबरी जिथे संपते, तिथेच नव्याने सुरू होते हे कादंबरीच्या शेवटी जाणवते. यातच या कादंबरीचे यश आहे.
लेखक. विक्रम भागवत
प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन .
