Akshardhara Book Gallery
Stri- Purush Sahajivan (स्त्री-पुरुष सहजीवन)
Stri- Purush Sahajivan (स्त्री-पुरुष सहजीवन)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dada Dharmadhikari
Publisher: Parandham Prakashan
Pages: 160
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Stri- Purush Sahajivan (स्त्री-पुरुष सहजीवन)
स्त्री-पुरुषांत विशुद्ध पारस्परिक सख्यभक्तीचा संबंध स्थापन व्हावा. याचा आरंभ म्हणून कुटुंबातील नात्याची भावना समाजात दाखल केली पाहिजे हें आपण पूर्वी पाहिलेंच आहे. पण हें पहिलेंच पाऊल आहे. आपल्याला याच्याहि पुढे जायचें आहे. समाजात स्त्री-पुरुषांमध्ये मैत्रीचे संबंध वाढले पाहिजेत. शेंकडो वर्षांनंतर गांधीच पहिला असा पुरुष झाला असावा ज्याने आपल्या जीवनात दोन्ही प्रकारचे प्रयोग केले. स्त्री आणि पुरुष दोघेहि एकमेकांबरोबर सख्याच्या तुल्य भूमिकेवर राहू शकतात हे सिद्ध करण्याचा त्याने प्रयत्न केला. सामाजिक क्षेत्रात या तथ्याचा स्वीकार केला गेला नाही तर स्त्रीचें मानवत्व गौण आणि हीन राहील.
लेखक: दादा धर्माधिकारी
