Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Stryanchi Aatmcharitre : swarup Aani chikitsaka vivechan ( स्त्रियांची आत्मचरित्रे : स्वरूप आणि चिकित्सक विवेचन )

Stryanchi Aatmcharitre : swarup Aani chikitsaka vivechan ( स्त्रियांची आत्मचरित्रे : स्वरूप आणि चिकित्सक विवेचन )

Regular price Rs.495.00
Regular price Rs.550.00 Sale price Rs.495.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Ujwala Gokhale

Publisher: Sanskruti Prakashan

Pages: 425

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:---

स्त्रियांची आत्मचरित्रे : स्वरूप आणि चिकित्सक विवेचन 

'आत्मचरित्रलेखनाचा प्रवास बोधातून व्यक्तिदर्शन ते सामाजिक विषमताजन्य दुःखभोगांचे निवेदन या दिशेने झालेला दिसतो. आत्मचरित्र- लेखनाकडे पाहण्याचा बदलत गेलेला दृष्टिकोन लक्षात घेऊन त्याविषयीचा प्रगत समीक्षाविचारही येथे नोंदवला आहे. आत्मचरित्रांतून हाती येणारी विविध प्रकारची माहिती व निरनिराळ्या प्रकारचा तपशील यांकडे मानसशास्त्र, समाजशास्त्र, शैलीविज्ञानशास्त्र, स्त्रीवादी समीक्षा या प्रगत ज्ञानशाखा विदा data या स्वरूपात बघतात त्यामुळे आत्मचरित्रलेखनाला प्राप्त होणारी विविध परिमाणे ध्यानात येतात. समाजात पुरुषांना असणारे स्वातंत्र्य, ते करीत असलेले जीवनव्यवहार आणि कल्पनेपलीकडचे त्यांचे जीवन यांचे दर्शन पुरुषांच्या आत्मचरित्रांतून घडते. स्त्रियांच्या आत्मचरित्रांतून स्त्रीचा प्रवास हा बंधतेतून मुक्ततेकडे होत गेलेला दिसतो. स्त्रीजीवनावर अनेक प्रकारची बंधने होती. ती काटेकोरपणे पाळली जावीत अशी समाजाकडून अपेक्षा होती. या कालखंडात स्त्रीजीवनात जे अंतर्बाह्य परिवर्तन घडून आले. अनेक अवस्थांतरे झाली त्याचे प्रतिबिंब सियांच्या आत्मचरित्रांमधून जाणवते. या पूर्ण बदललेल्या जीवनाला शब्दांकित करताना या लेखनामागील विविध प्रेरणा व त्यांचा आविष्कार घडताना झालेले बदल यांतून प्रगटलेले आहेत. समाजातील सर्व जाती- पातींच्या व सर्व स्तरांतील खिया आपले जीवन जसे घडवीत होत्या, हे पाहणे देखील सामाजिकतेची वेगवेगळी अंगे ध्यानात येण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. ज्या आत्मचरित्रांनी अर्थपूर्ण लेखन करून, त्यास जी विचारगर्भता प्राप्त करून दिली, त्याविषयी चिकित्सा करून हाती आलेल्या महत्त्वाच्या निरीक्षणांची नोंद केली आहे.

प्रकाशक : संस्कृती प्रकाशन 

View full details