Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sujit Karlekarcha Swapnabhanga Aani Itar Katha (सुजित कार्लेकरचा स्वप्नभंग आणि इतर कथा)

Sujit Karlekarcha Swapnabhanga Aani Itar Katha (सुजित कार्लेकरचा स्वप्नभंग आणि इतर कथा)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Lili Joshi

Publisher: Rohan Prakashan

Pages: 150

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

सुजित कार्लेकरचा स्वप्नभंग आणि इतर कथा

पन्नास वर्ष वैद्यक व्यवसायात असल्याने लेखिका डॉ. लिली जोशी यांना असंख्य पेशंट्स, त्यांचे नातेवाईक, नात्यांमधील गुंतागुंत, मानसिक आंदोलनं आणि आर्थिक ताण हे सर्व अगदी जवळून पाहता आलं. रोजचे तेच ते पेशंट आणि तेच ते आजार असा सरधोपट दृष्टिकोन न ठेवता संवेदनशील मनाची ही लेखिका त्यांच्या अंतर्मनात शिरून, कल्पित शब्दांच्या दुनियेतून त्यांना बघू लागली. डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असताना आलेले दाहक, भेदक आणि अंतःस्पर्शी अनुभव यांतून मग भावपूर्ण कथा त्यांच्या मनात आकार घेऊ लागल्या... थांग न लागणारी अनेकविध पात्रं, नाट्यमय प्रसंग आणि समाजाची वास्तवचित्रणं करतानाही त्यातून निघू शकणारा सकारात्मक दृष्टिकोन या कथांमध्ये डोकावू लागला... आणि मग अनुभव व कल्पकता यांची गुंफण होऊन साकार झाल्या या चौदा कथा ! या कथांमधून डॉ. लिली जोशी यांच्या प्रगल्भ लेखणीचा जागोजागी प्रत्यय येत राहतो. मानवी स्वभावाची आणि समाजाची विविध रूपं टिपणाऱ्या कथांचा संग्रह... सुजीत कार्लेकरचा स्वप्नभंग. 

लेखक. डॉ. लिली जोशी 
प्रकाशक. रोहन  प्रकाशन

 

View full details