Akshardhara Book Gallery
Suman Kalyanpur (सुमन कल्याणपूर)
Suman Kalyanpur (सुमन कल्याणपूर)
Share
Couldn't load pickup availability
Author: Aparna Sant
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 121
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सुमन कल्याणपूर
स्त्रीत्व कसं असेल, तिच्या अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळुवार व्यक्त होणं कसं असेल, तर सुमनताईंसारखं..!प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित... शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्त्वाला ? त्यानं आपलं असं एक स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्वतःचा आवाज मिळाला तर किती मधुर असेल तो? तरल, सुरेल, वत्सल, शुद्ध उच्चारांचं लेणं लाभलेला, उत्तम पल्ला नि फिरत असणारा, तरी अत्यंत भावपूर्ण... सुमन कल्याणपूर यांच्या मराठी व हिंदी गाण्यातल्या सांगीतिक वैशिष्ट्यांचा स्मरणीय आढावा आणि त्यांच्या निकोपआवाजातल्या निवडक २५ गाण्यांचं रसग्रहण, प्रसिद्ध गायिका अपर्णा संत यांच्या शब्दात....
लेखक. अपर्णा संत
प्रकाशक. राजहंस प्रकाशन
