Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Summer Of Seventy Nine (समर ऑफ सेव्हंटी नाईन)

Summer Of Seventy Nine (समर ऑफ सेव्हंटी नाईन)

Regular price Rs.588.60
Regular price Rs.654.00 Sale price Rs.588.60
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Surendra Darekar

Publisher: Varnmudra Publishers

Pages: 244

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

समर ऑफ सेव्हंटी नाईन

समर ऑफ सेव्हंटी नाईन' ही कादंबरी भौगोलिकतः जेमतेम खाजगी-सार्वजनिक दूरभाष तर बहुतांश आधुनिक संपर्कयंत्रणेचा अभाव असलेल्या काळात घडणारी आहे. ती परिस्थितीवश मनोभंगाने दुरावलेल्या पण कालांतराने फिरून आपल्या मुळाशी येणाऱ्या मेधाच्या धडपडीची कहाणी आहे, तशीच ती बदलांच्या धक्क्यातून समायोजन साधत एका तटस्थ जीवनवृत्तीने घडत गेलेल्या वसंताची पण गोष्ट आहे. यातील पात्रांचा गोतावळा मिळून कुटुंबाची सत्तरच्या दशकातील घडण दर्शवितात, तर संस्थात्मक संबंधात्मक आंतरक्रिया तत्कालीन सामाजिक-आर्थिक स्थितीचा ताणाबाणा साकारतात. एकुणात या कथनातील घटनापट जीवनोर्मीच्या बहुविध रूपांची हाताळणी करत काही सूत्रे अधोरेखित करणारा आहे. यात श्रद्धा, विवेक, विज्ञान, तांत्रिक लोकाचार अशा घटकांची सरमिसळ दिसून येते. या दृष्टीने हे कथन म्हणजे गुंतागुंतीच्या निर्णयप्रक्रियेचे एक बहुपेडी शक्तिसूत्रच म्हणावे लागेल. कटोकटीच्या मध्यमवर्गीय पर्यावरणात जगताना उद्भवणाऱ्या अनेक समस्यांची दाट वीण, त्यातील हताशेतून येणारी शरणता तरीही उभारी धरण्याची जिद्द व अदम्य प्रयत्नवाद, हे सारेच एका कालाचे मूल्यभान दर्शवतात. पात्रांच्या स्वभावचित्रणात भरलेले कमीअधिक गडद रंग, निवेदनाची वेगवान संज्ञाप्रवाहरूप तरी कथनाशी एकजीव होणारी शैली वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येतील. एकुणात या स्वरमेळाचे कालदर्शित्व, प्रश्नांकित करणारे तरी मानवीयच. एका कालावकाशाचे भौतिक व आधिदैविक रूप साकारणारी म्हणून ही कादंबरी महत्त्वाची आहे. ----डॉ. सुधीर रसाळ

लेखक. सुरेंद्र दरेकर 
प्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स 

View full details