Akshardhara Book Gallery
Sunit (सुनीत)
Sunit (सुनीत)
Share
Couldn't load pickup availability
Author: Suniti Jain
Publisher: Granthali
Pages: 143
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सुनीत
पुस्तकातील सुनीतीचं लिखाण हे पुष्कळसं आत्मचरित्रपर आहे. त्यात स्मरणरंजनाचा भाग आहे, त्याबरोबरच तिच्या जडणघडणीतून तिची जिद्द, तिची चिकित्सक दृष्टी, कोणतंही काम तडीस नेण्याचा तिचा स्वभाव दिसतो. आयुष्याच्या वाटचालीत तिला अनेक जिवाभावाच्या मित्रमैत्रिणी आयुष्यभर भेटल्या. त्यांच्याशी तिची मैत्री टिकून राहिली. आई-वडील, अन्य नातेवाईक, शिक्षक, अन्यत्र भेटलेल्या व्यक्ती यांची ठसठशीत व्यक्तिचित्रं रेखाटून त्या व्यक्ती वाचकाच्या डोळ्यांसमोर तिनं उभ्या केल्या आहेत. हुबेहूब वर्णन करण्याची तिची हातोटी केवळ व्यक्तिचित्रांपुरतीच मर्यादित नव्हती. ती ज्या ज्या वास्तूत राहिली, तेथील तपशील वाचून एखादा वास्तुरचनाकार तसं घर उभारू शकेल, इतकी ती जिवंत, रसरशीत आणि नेमकी आहेत. जीवघेण्या प्रसंगांचं वर्णन वाचताना वाचक अवाक् होतो. जीवन जगताना सतत सामाजिक जाणीव ठेवणं हा वारसा तिला आई-आजीकडून मिळाला. आपल्या ओळखी-पाळखीचा पुरेपूर वापर तिने केला, पण तो कधीच वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हता. आपली बाजू बरोबर आणि सत्याची असली तर समोरची व्यक्ती कितीही मोठ्या हुद्द्यावरची असली तरी नमतं घ्यायचं नाही, हा तिचा बाणा तिनं आयुष्यभर जपला.
लेखक. सुनीती जैन
प्रकाशक. ग्रंथाली
