Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

SWIKRUT (स्वीकृत)

SWIKRUT (स्वीकृत)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: SUNANDA MAHAJAN

Publisher: MIHANA PUBLICATIONS

Pages: 212

Edition: latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:David Wagnar

स्वीकृत

डाव्हिड वाग्नर या तरुण लेखकाची २०१३ साली प्रसिद्ध झालेली 'लेबन' ही एक पुरस्कारप्राप्त जर्मन कादंबरी आहे. २०१३ च्या जर्मनीतील लाईपत्सिग गावातील पुस्तकजत्रेचा ललित साहित्यासाठीचा मानाचा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला. आपल्या आयुष्याविषयी, आपल्या शरीराविषयी, मृत्यूच्या शक्यतेविषयी, जवळ येऊन ठाकलेल्या आणि हाडी-माशी जाणवणाऱ्या मरणाच्या निश्चितीविषयी माणूस इतका तटस्थपणे तरीही इतक्या आत्मीयतेने विचार करू शकतो ? तसा विचार शब्दांत मांडू शकतो? हे कसे शक्य होते? असे अनेक प्रश्न वाचताना पडत होते, सुटतही होते. पुस्तक रूढार्थाने कादंबरी नाही, फक्त आजारपणाचे आणि त्यावरच्या उपचारांचे वर्णनही नाही. काळाच्या दृष्टीने एक सरळसोट, सलगपणे सांगितलेली व्याधीची आणि त्यावरील उपचारांची गोष्टही नाही. पुस्तकातील निवेदक सुरुवात करतो तेव्हा त्याचे आजारपण कडेलोटापर्यंत आलेले असते, यकृताच्या प्रत्यारोपणाविषयीचा निर्णय घ्यायला लागणारच, इथवर येऊन ठेपलेले असते. मग दवाखान्यात दाखल झाल्यावर, मध्येच घरी आल्यावर, परत प्रत्यारोपणासाठी दवाखान्यात दाखल झाल्यावर या सगळ्या कालावधीत त्याच्या मनात येणारे विचार, आठवणी, त्याने अनुभवलेले तेथील उपचार आणि दवाखान्यातील दिवस या सगळ्यांची सरमिसळ करून तो आपल्याला त्याची गोष्ट सांगत राहतो.

लेखक :सुनंदा महाजन 
प्रकाशन : मिहाना प्रकाशन 

View full details