Akshardhara Book Gallery
Taath Kana (ताठ कणा २)
Taath Kana (ताठ कणा २)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Premanand Ramani
Publisher: Granthali
Pages: 149
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Savita Damle
ताठ कणा २
डॉ. पी.एस. रामाणी यांचे 'ताठ कणा' हे आत्मकथन २००५मध्ये प्रसिद्ध झाले. 'ताठ कणा २' हा त्यापुढच्या प्रवासाचा पट आहे. जागतिक स्तरावर आपल्या कार्याची मोहोर उमटवलेले डॉ. रामाणी विश्वातील न्यूरोसर्जनांत उच्चस्थानी आहेत. त्याच वेळी ते सामान्यांत सामान्य होऊन, लहान-मोठेपणाचा भेदभाव न करता धावणे, समाजकार्यात सहभाग घेणे, गिर्यारोहण करणे असा अनेक अंगांनी जीवनाचा आस्वाद घेतात. त्यांच्या डोळ्यांतील करुणा, हृदयातील प्रेम आणि बोटांतली जादू यातून आज दुर्मिळ झालेले डॉक्टरबद्दल वाटणारे ममत्व ते कायम राखून आहेत. आयुष्याची कांचनसंध्या साजरी करताना ते वाचकाला जीवनविषयक दृष्टी देतात. ज्ञानदानाचे महत्त्व सांगतात आणि समाजभानाची जाणीव पेरतात. त्यांचे जीवनाच्या उत्तररंगातील हे कथन त्यांच्या व्यक्तित्वासारखेच सहज, प्रांजळ आणि दर्जेदार आहे.
लेखक : डॉ. प्रेमानंद रामाणी
शब्दांकन : सविता दामले
प्रकाशन : ग्रंथाली
