Akshardhara Book Gallery
Tarang (तरंग )
Tarang (तरंग )
Couldn't load pickup availability
Author: Kalyaniraman Bennurvar
Share
Publisher: Mehta Publishing House
Pages: 200
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
तरंग
आयुष्याच्या वाटचालीत अनेकांच्या अनुभवांचे आपण साक्षीदार असतो. कधी त्या घटनांमध्ये आपला प्रत्यक्षअप्रत्यक्ष सहभाग असतो कधी स्वेच्छापूर्वक वा आकस्मिकपणे किंवा नाइलाजाने आपद्धर्म म्हणून. अनेक व्यक्ती भेटतात. कुणी चटका लावून जातात, कुणी चटका देऊन जातात. कुणी धडा घालून देतात तर कुणी धडा शिकवतात. कालौघात पुढे कधीतरी कारणपरत्वे मनामध्ये आठवणी उचंबळून येतात; भावभावनांच्या विविध लहरींनी मन व्यापून जाते. कधी व्याकूळ होते. या आठवणींना कल्पिताच्या मखरात बसवल्यानंतर ज्या कथा निर्माण झाल्या, त्या कथांचा संग्रह म्हणजेच 'तरंग'. या कथा वाचकाला आपल्याच अनुभवांचे किंवा अनुभूतींचे प्रतिबिंब वाटल्या शिवाय राहणार नाहीत.
लेखक : कल्याणीरमण बेन्नुरवार
प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस
