Akshardhara Book Gallery
Tarkangan (तारकांगण)
Tarkangan (तारकांगण)
Share
Couldn't load pickup availability
Author: Pro. Avinash Sapre / Sadanand Kadam
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 336
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
तारकांगण
अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन यांचा आयुष्यभर ध्यास घेतलेल्या आणि हेच आपले जीवितकार्य मानणाऱ्या प्रा.डॉ. तारा भवाळकर यांना महाराष्ट्राच्या विचारविश्वात एक ज्येष्ठ आणि व्यासंगी विदुषी म्हणून ओळखले जाते. हे स्थान त्यांना त्यांच्या स्वप्रतिभेने, प्रज्ञेने आणि कठोर साधनेने मिळालेले आहे. लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला या विषयांच्या भाष्यकार म्हणून त्या सर्वज्ञात असल्या तरी या ज्ञानक्षेत्रांबरोबरच नाटक आणि रंगभूमी, मराठी भाषा आणि साहित्य, स्त्रीमुक्ती चळवळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ हेही त्यांच्या आस्थेचे विषय आहेत आणि या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलं आहे. तुकोबांच्या शब्दांत बाईंनी अक्षरांचा श्रम केला आणि मौल्यवान विचारांची मौक्तीके निर्माण केली. त्यांना महत्त्वाचे संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. अशा अभ्यासपूर्ण लेखनाबरोबरच बाईंनी कथालेखन, ललितलेखन, विनोदीलेखन, काव्यलेखन, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, अनुवाद, आस्वादपर लेखन, प्रस्तावना इ. प्रकारचे लेखनही लक्षणीय स्वरूपात केले आहे. हे सगळंच लेखन अद्याप ग्रंथबद्ध झालेले नाही. या साऱ्यांतून निवडलेले प्रातिनिधिक स्वरूपाचे लेखन या तारकांगणमध्ये वाचायला मिळेल.
संपादक. प्रा. अविनाश सप्रे / सदानंद कदम
प्रकाशक. मनोविकास प्रकाशन
