Akshardhara Book Gallery
Tata Pravas : Mulyadhishthit Jaganyacha (टाटा प्रवास : मूल्याधिष्ठित जगण्याचा)
Tata Pravas : Mulyadhishthit Jaganyacha (टाटा प्रवास : मूल्याधिष्ठित जगण्याचा)
Couldn't load pickup availability
Author: Don Dungaji
Share
Publisher: Indus Source Books
Pages: 342
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Ravindra Manjarekar
टाटा प्रवास : मूल्याधिष्ठित जगण्याचा
"डॉन डुंगाजी यानी 'टाटा मूल्ये' म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव तब्बल चार दशकांच्या कार्यकाळात घेतला आहे. टाटांच्या या तत्त्वज्ञान आणि संस्कृतीने त्यांना कसे सामावून घेतले आणि त्याच 'टाटा मार्गा'ने परिवर्तन घडवून आणताना समाधान कसे लाभले, याविषयी त्यांनी या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे. हे पुस्तक म्हणजे टाटा समूहाच्या सेवेत वाहून घेतलेल्या एका ध्येयवादी सहकाऱ्याने त्या समूहाला वाहिलेली आदरांजली आहे."
"पाच दशकांपूर्वी, टाटा समूहात मी आणि डॉन डुंगाजी एकाच वेळी, एकाच ठिकाणी टाटा स्टिलच्या कार्यालयात रुजू झालो. आमचे कार्यालय समूहाचे अध्यक्ष जेआरडी टाटा यांच्या कार्यालयालगत होते. आम्ही दोघांनीही आमच्या पहिल्या नोकरीत, 'टाटा मार्ग' आणि 'टाटा मूल्ये' शिकत कामाला सुरूवात केली. पंचवीस वर्षे मी त्यात आकंठ बुडालेलो होता. व्यवसायाच्या सगळ्या संकल्पना, नीतिमत्ता यांना तेथेच आकार मिळाला. त्यानंतर मी दुसरीकडे गेलो. डॉन मात्र शेवटपर्यंत समूहाबरोबच राहिला. तिथे तो जे शिकला आणि ज्या पद्धतीने त्याने ते सारे आत्मसात केले तो सगळा प्रवास हाच चांगुलपणा, मूल्याधारित, व्यवसाय व्यवस्थापनाचा 'टाटा मार्ग' आहे."
लेखक. डॉन डुंगाजी
अनुवादित लेखक. रवींद्र मांजरेकर
प्रकाशक. इंडस सोर्स बुक्स
