Akshardhara Book Gallery
Teen Dagadanchi Chul ani Chandra (तीन दगडांची चूल आणि चंद्र)
Teen Dagadanchi Chul ani Chandra (तीन दगडांची चूल आणि चंद्र)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vasant Vahokar
Publisher: Shabdalay Publication House
Pages: 120
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
तीन दगडांची चूल आणि चंद्र
शब्दांना वाटते,
सापडला आता हा जाळ्यात.
आणि ह्याला खात्रीच,
शब्द तर काय आता
दावणीचं जनावर.
शब्द गाठतात ह्याला एकांतात
भरदिवसा नाहीतर अपरात्री, धरतात गळा.
गुदमरतो जीव ह्याचा... आणि श्वास. हाही बिलंदर !
जनावर सोडतो मोकाट पिकांत, दिसेल त्याच्या.
गाव झोपल्यावर मध्यरात्रीला.
जाळे होते घट्ट, अधिक घट्ट... दिसरात्रींचे.
हा तळमळतो. तडफडतो. हाक घालतो मदतीची.
सुनसान चहूओर किनारे.
पोट फुगून जनावर येते परत, अपरात्री दावणीशी
झाडते हातपाय... खाल्लेलं दाटून आलं म्हणून.
कविता असणारी कुणी एक म्हातारी, कण्हत असते दिवसरात्र
या खेळात... तुटक्या बाजल्यावर... वर्तमानाच्या.
लेखक : वसंत वाहोकार
