Akshardhara Book Gallery
THANG ATHANGACHE (थांग अथांगतेचा)
THANG ATHANGACHE (थांग अथांगतेचा)
Share
Couldn't load pickup availability
Author: KUMAR KETKAR
Publisher: DIMPLE PUBLICATION
Pages: 268
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:---
थांग अथांगतेचा
विसावे शतक जरा लांबलेच. त्या शतकाच्या सुरुवातीलाच, १९०३ साली, राईट बंधूंनी पहिल्यावहिल्या विमानाचे उड्डाण केले आणि १९०५ साली अल्बर्ट आईन्स्टाईनने त्याचा सापेक्षतावादाचा क्रांतिकारक सिद्धांत मांडला. म्हणजे तसे पाहिले तर विज्ञान-तंत्रज्ञान माणसाला भविष्यात झेपावून नेत होते; पण त्याच वेळेस इतिहास-भूगोलाच्या पायात अडकलेल्या शृंखला त्याला खाली खेचत होत्या. त्याच सुमाराला, म्हणजे १९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करून १९४७च्या फाळणीच्या थरारक नाट्याची नांदी सादर केली होती. त्याच वर्षी म्हणजे १९०५ सालीच रशियात पहिली लोकशाही क्रांती झाली आणि १९१७ च्या कामगार क्रांतीसाठी त्या महानाट्याचा पडदा वर गेला.
एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकाने हे आतापर्यंत स्पष्ट केले आहे की, कोणताही देश, कोणतीही विचारसरणी, कोणतीही व्यक्ती, कोणताही धर्म वा कोणतीही संस्था/संघटना आताच्या जगाला दिशा देऊ शकत नाही, नियमन वा नियंत्रण करू शकत नाही, इतकेच काय आदर्शही देऊ शकत नाही. स्पर्धा, संशय आणि संघर्ष यांनी बहुसंख्य लोकांना वेढलेले आहे आणि राष्ट्र-राज्य ही संकल्पना आता मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यातील अडथळा ठरू लागली आहे.
लेखक :कुमार केतकर
प्रकाशन : डिंपल पब्लिकेशन
