Akshardhara Book Gallery
The Little Guide To Greater Glory & A Happier Life (द लिटिल गाईड टू ग्रेटर ग्लोरी अँड अ हॅपियर लाईफ)
The Little Guide To Greater Glory & A Happier Life (द लिटिल गाईड टू ग्रेटर ग्लोरी अँड अ हॅपियर लाईफ)
Share
Couldn't load pickup availability
Author: Shri S M
Publisher: Sakal Prakashan
Pages: 46
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Shri V Patwardhan
द लिटिल गाईड टू ग्रेटर ग्लोरी अँड अ हॅपियर लाईफ
एक गुरू, एक समाजसुधारक, एक शिक्षणतज्ज्ञ व एक लेखक अशा श्री एम यांचा जन्म केरळमधील तिरुअनंतपुरम येथे झाला. आंध्र प्रदेशात बंगळुरूपासून तीन तासांच्या अंतरावर असलेल्या मदिनापल्ली या गावी ते राहतात. त्यांचा एक युवक ते योगीपुरुषापर्यंतचा प्रवास म्हणजे समर्पित भावनेने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याची एक कथाच आहे. एकोणीस वर्षांचे वय असताना हिमालयात जाण्याच्या एका आश्चर्यकारक व अनावर अशा ऊर्मनि त्यांनी घर सोडलं. हिमालयातील बद्रीनाथच्या पुढे असलेल्या व्यास गुहेपाशी त्यांना त्यांचे गुरू भेटले. त्यांच्या सोबत साडेतीन वर्षे राहून हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतराजीमध्ये त्यांनी मुक्त भ्रमंती केली. त्यांचे गुरू महेश्वरनाथ बाबाजी यांच्याकडून ते जे काही शिकले त्यांतून त्यांच्या जाणिवात परिवर्तन घडून आलं. गुरूंच्या सूचनेनुसार ते समुद्र सपाटीवर परतले. चरितार्थासाठी काम करत, सामाजिक बांधिलकी जपत; ते जे काही शिकले आहेत, ज्याचा त्यांनी अनुभव घेतला आहे, ते इतरांना शिकवण्यासाठी स्वतःची तयारी करत एक साधं जीवन ते जगू लागले. आजकाल ते त्यांनी मिळवलेले ज्ञान इतरांना देण्यासाठी व त्यांच्या अनुभवांचं कथन करण्यासाठी जगभर प्रवास करत असतात. भारतातील प्रमुख धर्माविषयी शिकवण देताना ते सांगतात, "गाभ्यापर्यंत पोहोचा. नुसत्या सिद्धांताचा काही उपयोग नाही." श्री एम हे 'सत्संग फाउंडेशन'चे आणि 'मानव एकता मिशन'चे संस्थापक व अध्यक्ष आहेत. समाजामधील, शिक्षण व आरोग्य या विषयांत कमी विषेशाधिकार असलेल्या वर्गाला सेवा देणं आणि सर्व धर्मात असलेल्या एकात्म भावनेचं संगोपन करणं यासाठी १९९४मध्ये या संस्थांची स्थापना करण्यात आली. आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांच्या उच्च श्रेणीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जानेवारी २०२० मध्ये 'पद्मश्री' हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरकार त्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. श्री एम हे विवाहित असून त्यांना दोन अपत्यं आहेत. 'सत्संग फाउंडेशन' या धर्मादाय संस्थेतर्फे ते शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन देत आहेत. आध्यात्मिक मार्गदर्शन करत ते एक साधं जीवन जगत आहेत.
लेखक. श्री एम
अनुवादित लेखक. श्री. वि. पटवर्धन
प्रकाशक. सकाळ प्रकाशन
