Skip to product information
1 of 2

The Most Important Thing ( द मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग )

The Most Important Thing ( द मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.225.00
-25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 253

Edition: 1st

Binding: Paperback

Language:English

Translator:Poonam Chatre

हावर्ड मार्क्स हे " ओकट्री कॅपिटल मॅनॅजमेन्ट' चे अध्यक्ष व सह-संस्थापक आहेत आणि बाजारात असलेल्या संधी आणि जोखीम यांच्याबद्दल सखोल मूल्यमापन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. गुंतवणूक व्यवस्थापनाच्या व्यवसायात चार दशकांहून अधिक काळ सर्वोच्च स्थानावर व्यतीत केल्यामुळे आज जगातले आघाडीचे मूल्याधारित गुंतवणूकदार त्यांचा सल्ला घेतात. त्यांनी लिहिलेल्या मेमोनमध्ये चतुराईने केलेले भाष्य असते. काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले मूलभूत तत्वज्ञानही डोकावते. आणि आता, पहिल्यांदाच, सर्व वाचकांना मार्क्स यांच्या ज्ञानाचा फायदा मिळणार आहे. या पुस्तकाद्वारे नवख्या आणि मुरलेल्या गुंतवणूकदारांशीही मार्क्स यांनी संवाद साधलेला आहे.
आयुष्यभराचा अनुभव आणि अभ्यास यांचे संचित घेऊन द मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग हे पुस्तक यशस्वी गुंतवणुकीची गुरुकिल्ली आणि भांडवल बुडवू शकणारे किंवा करिअर उदध्वस्त करू शकणारे धोके समजावून सांगते. आपल्या कल्पना विशद करण्यासाठी मार्क्स यांनी उदाहरणांसहित आधी लिहिलेल्या
चिठठयांमधले परिच्छेद वापरले आहेत आणि गुंतवणुकीमधील गुंतागुंत आणि आर्थिक जगतातील संकटे संपूर्णपणे उलगडून दाखवणारे गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान कसे विकसित होत गेले, हेही सांगितले आहे. आजच्या अस्थिर बाजाराला मार्क्स यांनी त्यांचे अनुभव विचार जोडलेले आहेत. मार्क्स यांच्या या पुस्तकात थोड्या आठवणी, थोडे समूहशास्त्र आणि अनेक अनुभवांमधून मिळालेले ज्ञान, असे सगळे एकत्रितपणे आहे.

"त्यात समाविष्ट असलेली अत्यावश्यक सत्यकथन आणि सुरेख दृष्टिकोन यांसाठी हॉवर्ड मार्क्स यांच्याकडून नियमितपणे येणाऱ्या गुंतवणुकीसंबंधी मेमोनची आवर्जून वाट पहिली जाते. आता या महान गुंतवणुकीदाराचे ज्ञानभांडार आणि अनुभव सर्वांसाठी उपलब्ध आहे. मार्क्स यांचे गुंतणुकीसंबंधीचे तत्वज्ज्ञान आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला दृष्टिकोन, तड मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग्जमधून वाचकांच्या भेटीला आलेला आहे. प्रत्येक गुंवणूकदाराने वाचायलाच हवे, असे हे पुस्तक आहे." - सेथ ए. क्लार्मन (अध्यक्ष, द बाऊ पोस्ट ग्रुप )

View full details