Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Think Yourself Gorgeous (थिंक युवरसेल्फ गॉर्जियस)

Think Yourself Gorgeous (थिंक युवरसेल्फ गॉर्जियस)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.240.00 Sale price Rs.144.00
40% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Anita Nayak

Publisher: Mehta Publishing House

Pages: 186

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Manjusha Mulay

थिंक युवरसेल्फ गॉर्जियस 

थिंक युवरसेल्फ गॉर्जियस' या पुस्तकात अनुभवी स्तंभलेखिका अनिता नायक यांनी अतिशय प्रामाणिक, व्यावहारिक आणि खात्रीलायक असे मार्गदर्शन केले आहे, ज्याची तुम्हाला तुमची वयात येण्याची वर्षे अगदी सहजपणे पार करण्यास नक्कीच मदत होईल. त्यांनी असे दाखवून दिले आहे की, खालावलेली स्वप्रतिमा आणि वाईट शरीरप्रतिमा असणे, हे प्रत्येकाच्याच बाबतीत घडत असते; मग ती व्यक्ती समाजात कशीही वागत असली (अगदी सुप्रसिद्ध मुलींचाही यात समावेश आहे.) तरीही आणि स्वतःच्या सर्व दोषांसह प्रेम करणे शिकण्यासाठी काय काय आणि का करावे लागते, हेही त्यांनी सांगितले आहे.

 सौंदर्य, बारीकसारीक ताणतणाव, आत्मविश्वास, स्वप्रतिमा, शरीरप्रतिमा, वयात येणे आणि भावभावना या सर्वच गोष्टी अंतर्भूत असणारे 'थिंक युवरसेल्फ गॉर्जियस' हे पुस्तक म्हणजे, तुम्हाला स्वतःबद्दलच कमीपणा का वाटतो, कंटाळल्यासारखे वाटणे कसे नैसर्गिक आहे, तुमच्या दिसण्यापासून तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि तुमच्या शरीराबद्दल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला असुरक्षित का वाटते, हे सर्व समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत करणारे आहे. तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल विश्वास वाटावा यासाठीचा सल्ला, अर्थपूर्ण माहिती आणि प्रत्यक्षात आणता येतील असे मार्गदर्शक मुद्दे या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे हे पुस्तक, तुमचा आत्मविश्वास डळमळीत करणाऱ्या सगळ्या फसव्या गोष्टी तुमच्या लक्षात आणून देण्यास मदत करेल आणि तुम्हाला अंतर्बाह्य सुंदर वाटावे यासाठीही मदत करेल.

लेखक :  अनिता नायक 
अनुवाद : मंजुषा मुळे 
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details