Akshardhara Book Gallery
Tihar Turungachya Bhintiaad (तिहार तुरुंगाच्या भिंतीआड)
Tihar Turungachya Bhintiaad (तिहार तुरुंगाच्या भिंतीआड)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sunil Gupta / Sunetra Chaudhari
Publisher: Krishna Publications
Pages: 186
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Mukund Vaze
तिहार तुरुंगाच्या भिंतीआड
थरकाप उडवणाऱ्या, मती गुंग करणाऱ्या आणि खिळवून ठेवणाऱ्या सत्यकथा... कैद्यांना धडकी भरवणारा आणि सामान्यांचं कुतूहल जागृत करणारा तिहार तुरुंग ! तिहारच्या उंच तटबंदीमागचं जग नेमकं आहे तरी कसं? रेल्वे प्रशासनातील नोकरीला राम राम ठोकून तिहार तुरुंगात एएसपी म्हणून रूजू झालेल्या सुनील गुप्ता या डोळस, धाडसी, संवेदनशील तरीही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचं हे पुस्तक ! 'तिहार तुरुंगाच्या भिंतीआड'चं राजकारण, गुन्हेगारांना त्यांच्या 'दर्जा' नुसार मिळणारी वागणूक, कैद्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात उठवलेला आवाज आणि घडवलेल्या सुधारणा, तिहारची अंतर्गत रचना, फाशीचं शास्त्र, अट्टल गुन्हेगारांची दुसरी बाजू या सगळ्यांचं रंजक दर्शन हे पुस्तक घडवतं. हे पुस्तक अनेक गौप्यस्फोट करतं : आशियातील सर्वांत मोठ्या तुरुंगातील जीवन कसं असतं ? एखाद्या गुन्हेगाराला फाशी दिल्यानंतर दोन तासांनीही त्याची नाडी चालूच असते, तेव्हा काय होतं ? 'निर्भया'चा बलात्कारी रामसिंग याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली ? जेसिका लालचा हत्यारा मनू शर्मा याने तिहारमधील कैद्यांचं, पर्यायाने तुरुंगाचं अर्थकारण कसं बदलवलं ? अफजल गुरूच्या फाशीबाबत सरकारने एवढी गुप्तता का पाळली ? अफजल गुरूच्या आठवणीने लेखक सुनील गुप्ता हळवे, भावूक का होतात ? भ्रष्टाचाराविरोधात अख्ख्या देशात रान उठवणारे अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातील स्थानबद्धता ते त्यांची सुटका ही तारेवरची कसरत पार पाडताना जेल प्रशासनाची कशी तारांबळ उडाली ? कैद्यांनी पळून जाण्याच्या फसव्या प्रयत्नांत कोणत्या गमतीजमती घडतात ?
मूळ लेखक. सुनील गुप्ता / सुनेत्रा चौधरी
अनुवादित लेखक. मुकुंद वझे
प्रकाशक. कृष्णा पब्लिकेशन्स
