Time And Self Management ( टाईम अँड सेल्फ मॅनेजमेंट)
Time And Self Management ( टाईम अँड सेल्फ मॅनेजमेंट)
Share
Author:
Publisher:
Pages: 296
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कांचन दीक्षित या टाइम मॅनेजमेंट व सेल्फ मॅनेजमेंट प्रशिक्षक आहेत. घड्याळाशिवाय वेळ व्यवस्थापन व स्व-व्यवस्थापन करून जगणं सुंदर, सजग व अर्थपूर्ण कसं करावं याचं आजवर एक हजाराहून अधिक व्यक्तींना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. वेळ नावाची अमूल्य गोष्ट तसं बघायला गेलं तर आपल्यासाठी अक्षरशः फुकट उपलब्ध असते. त्यामुळेच कदाचित आपण तिचं महत्त्व जाणत नाही. वेळ का महत्त्वाचा आहे आणि दैनंदिन जीवनात त्याचा विनियोग आपण जर सजगतेने केला तर भौतिक आणि मानसिक पातळीवर आपण अतिशय सकारात्मक परिणाम कसे मिळवू शकतो याचा वस्तुपाठ हे पुस्तक देतं. दीक्षितांनी वेळेचं व्यवस्थापन करताना आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं, याच्या अनुकरणीय गोष्टी सांगितल्या आहेत. युवा ते वृद्ध, नोकरदार ते व्यावसायिक, स्त्री-पुरुष अशा सर्वांसाठीच हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
या पुस्तकाचे लेखक : कांचन दीक्षित , प्रकाशक : साकेत प्रकाशन