Trividha ( त्रिविधा )
Trividha ( त्रिविधा )
Share
Author:
Publisher:
Pages: 217
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Trividha ( त्रिविधा )
Author : Makarand Sathe
'त्रिविधा' हे लेखक मकरंद साठे यांचे पुस्तक म्हणजे तीन भिन्न साहित्यप्रकारांतील, भिन्न पात्रसमूह व भिन्न कथानके असलेल्या पण समान आशयसूत्रांनी जोडलेल्या संहितांचा समूह आहे. जागतिकीकरणानंतर मानवी समूहाच्या प्रचंड मोठ्या पटावरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हालचाली कवेत घेत समकालात उदयाला आलेले अवकाशांचे राजकारण 'त्रिविधा'च्या आशयसूत्रांच्या हाताळणीतून मूर्त होत जाते. मिथ्यकथांचा उपयोग, कथानकाने घेतलेली अनपेक्षित वळणे, रचण्याच्या प्रक्रियेतील जाणीवपूर्वकता सतत उघडी पाडणारी अधिकथनात्म भाष्ये आणि सकस वैचारिक गद्य यांच्या जाणीवपूर्वक केलेल्या मिश्रणामधून 'त्रिविधा' कथनाचे रूपांतर कथ्यामध्ये करते. विनाशाच्या कडेलोटापर्यंत पोहोचलेले जग, त्यात उद्भवणारे अस्तित्वलक्ष्यी, सामाजिक आणि विशेषतः राजकीय गाभा असलेले प्रश्न 'त्रिविधा'मधून दचकवत पुढे येतात. द्वेष आणि हिंसा यांच्या ताणाखाली होणारी सामाजिक विघटनाची प्रक्रिया, त्यामुळे बिकट होत जाणारी अस्मितेची जडणघडण आणि परिणामतः अविवेकशील यादृच्छिकतेच्या हवाली होणारे मानवी आयुष्य 'त्रिविधा'मधून पुढे येते.
It is Published By : Popular Prakashan Pvt Ltd.