Akshardhara Book Gallery
Trushnakarsha तृष्णाकर्ष)
Trushnakarsha तृष्णाकर्ष)
Couldn't load pickup availability
Author: Tejas Modak
Share
Publisher: Varnamudra Publishers
Pages: 90
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
तृष्णाकर्ष
वर्णमुद्राच्या गरुडदृष्टीस म्हणा की सीसीटीव्ही कॅमेरामध्ये म्हणा हा कवी कैद झाला, ती विलक्षण योगायोगाची गोष्ट ठरली. ब्लॉगवर कविता लिहिणारा तेजस तत्कालीन संपादक व ब्लॉग वाचक दिनकर मनवरांच्या नजरेने हेरला त्या वेळी मी नागपूरला होतो. कविता वाचून 'संग्रहाइतपत (ही संख्या किती असावी? ते अद्याप कुणी ठरविलेले नाही तरीही) कविता आहेत की कसे? संग्रहोत्सुक आहात किंवा कसे ? आम्ही (वर्णमुद्रा) स्वीकारार्ह आहोत का?' या व तत्सम प्रश्नांकरिता कवीला फोन लावला व कळवले की, मी असा असा प्रकाशक, शेगाव जिल्हा बुलडाणा. पलीकडून कवी म्हणाला- मी शेगावलाच आहे कालपासून, परवा पुण्याला परत जाईन. मी एक क्षणभर थबकलो व नागपूरहून शेगावला आलो. यापुढील गोष्टी 'खासगी' सदरात मोडतात. तेजसची कविता काय नि कशी हे काळ नावाचा समीक्षक ठरवेलच, बाजूला प्रभाकर कोलतेंसारख्या दिग्गजाचे ओथंबून लिहिलेले शब्दच पुरेसे व बोलके आहेत. व्यक्तिशः मला (माझ्या मुलांसह) कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली ही मुलं मराठीचं काय करणार, अशी काळजी असते. - त्याच कॉन्व्हेंट पिढीतील एक असलेल्या तेजसने तूर्त तरी माझी ती काळजी निराधार ठरवली आहे. हे आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाचे आहे. ह्या अंकुराचा विशाल वृक्ष होत जाताना पाहणे वर्णमुद्रासाठी अपार आनंदाचे ठरणार आहे.
संपादक. तेजस मोडक
प्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स
