Tumachya Udyasathi Apala Aaj Denara Sainik ( तुमच्या 'उद्या' साठी आपला ' आज' देणारा सैनिक )
Tumachya Udyasathi Apala Aaj Denara Sainik ( तुमच्या 'उद्या' साठी आपला ' आज' देणारा सैनिक )
Share
Author:
Publisher:
Pages: 159
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
भारतीय सैनिक. शौर्य, निर्धार अन् निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक. सियाचीनच्या उणे पन्नास अंशापासून रणरणत्या वाळवंटाच्या अधिक पन्नास अंश सेंटिग्रेड तापमानापर्यंत, असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारा हा सैनिक. देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून त्याचा जागता पहारा असतो, म्हणून तुम्ही आपापल्या उबदार घरट्यात सुखाची झोप घेऊ शकता. दगाबाज दुश्मनाचा वार तो आपल्या निधड्या छातीवर झेलतो, म्हणून तुम्ही जल्लोषात अन् उत्साहात उत्सव अन् उरूस, सण अन् समारंभ साजरे करू शकता. असा हा ‘भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' मानणारा, कर्तव्यकठोर निश्चयातही माणूसपणाची कोवळीक जपणारा, तुमच्या ‘उद्या'साठी आपला ‘आज' देणारा सैनिक
या पुस्तकाचे लेखक : अनुराधा प्रभुदेसाई, प्रकाशक : राजहंस प्रकाशन